Join us

Lemon Market लिंबाची आवक घटली; भाव आणखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:42 AM

यंदा उन्हाचा तडाखा खूपच वाढल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यामुळे शीतपेये, लिंबू सरबत पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

यंदा उन्हाचा तडाखा खूपच वाढल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यामुळे शीतपेये, लिंबू सरबत पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे आवक थोडी कमी झाली आहे, तर बाजारातील मागणी मात्र वाढलेलीच आहे.

त्याचा परिणाम लिंबाचा दर बाजारात सध्या शेकडा ४०० ते ४५० रुपये आहे, तर किरकोळ विक्री सहा रुपये आहे. लिंबाच्या आकारानुसार बारा रुपयांना दोन किंवा तीन लिंबू मिळतात. इतर पेयांपेक्षा लिंबू सरबत आरोग्याला हितकारक असल्याने यंदा लिंबूने चांगलाच भाव खाल्ला. वाढत्या उन्हाने लिंबूला बाजरात चांगली मागणी असलेली दिसून आली.

आवक घटलीवळवाच्या पावसाचा फटका बसल्यामुळे बाजारात लिंबाची आवक घटली आहे. दुसरीकडे मागणी वाढत आहे. दर शंभर रुपये किलो, तर शेकडा ३५० ते ४०० रुपये इतका भाव आहे. त्यामुळे सरबत महाग होत आहे.

लिंबाचे भाव आणखी वाढणारलिंबाची मागणी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढत राहील, तोपर्यंत लिंबाचा दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन वर्षात लिंबू-कोकमचा वापर वाढला ओहे. लिबाचा दर वाढल्यामुळे सरबताऐवजी पर्याय म्हणून कोकमचा वापर अनेकांनी सुरू केला आहे. कोकममध्ये थोडी साखर आणि पाणी घातले की कोकम सरबत तयार होते. कोकमलाही बाजारात मागणी आहे.

लिंबू सरबत आता २५ रुपयांनासुरुवातीला अवघ्या दहा रूपयांना मिळणारा लिंबू सरबताचा भाव वाढलेला दिसून येत आहे. सरबतचा २० ते २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे अनेक जण सरबताला पर्याय शोधत आहेत.

सांगलीत आमच्या दुकानात विजयपूर, जत, पंढरपूर, सोलापूर आदी भागांतून लिबाची आवक होते. येथून जिल्हाभरात विक्री होते. मेमध्ये आवक थोडी कमी आणि दर जास्त हे नेहमीचेच चित्र असते. यंदाही तेच चित्र आहे. सध्या आवक मध्यम स्वरूपात आहे. किरकोळ लिंबू विक्री ४ ते ६ रुपये नग आहे. - इब्राहिम पठाण, लिंबू व्यापारी, मिरज

टॅग्स :बाजारमार्केट यार्डफळेफलोत्पादनसोलापूरपंढरपूर