Join us

उष्णतेसोबत लिंबूचा तोरा वाढला; वाचा बाजारात लिंबू दर किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:23 IST

Lemon Market : सध्या उन्हाळा सुरू असल्याने लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. अगदी गेल्या महिन्यापर्यंत दोन रुपयांना एक किंवा दहा रुपयांत पाच असा भाव असणारे लिंबू आता भाव खात आहे. मागणीच्या तुलनेने आवक कमी असल्याने या लिंबाचा भाव थेट दहा रुपयांना एक, तर वीस रुपयांना तीन लिंबू मिळत आहेत.

सध्या उन्हाळा सुरू असल्याने लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. अगदी गेल्या महिन्यापर्यंत दोन रुपयांना एक किंवा दहा रुपयांत पाच असा भाव असणारे लिंबू आता भाव खात आहे. मागणीच्या तुलनेने आवक कमी असल्याने या लिंबाचा भाव थेट दहा रुपयांना एक, तर वीस रुपयांना तीन लिंबू मिळत आहेत.

मागील आठवड्यापासून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे थंडपेयांची मागणी देखील वाढली आहे. सरबत, सोडा, लिंबूपाणी, उसाचा रस यामध्ये लिंबाचा वापर केला जातो. राज्यातील बाजारात सकाळच्या सत्रात आज पुणे-मोशी येथे लिंबूला कमीत कमी १०००० तर सरासरी ११५०० रुपयांचा दर मिळाला. यावेळी ४२ क्विंटल आवक झाली होती. 

तसेच बुधवार (दि.०९) रोजी राज्यात १२२० क्विंटल लिंबूची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवकेचा विचार करता मुंबई येथे कमीत कमी २५०० तर सरासरी ३२५० रुपयांचा दर मिळाला. तर पुणे येथे ३२००, कल्याण येथे ११०००, श्रीरामपुर येथे १००००, धाराशिव येथे ८२५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील लिंबू आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/04/2025
पुणेलोकलक्विंटल29850055003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल42100001300011500
09/04/2025
कोल्हापूर---क्विंटल685000100007500
जळगाव---क्विंटल118000100009000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल16500090007000
श्रीरामपूर---क्विंटल1780001200010000
राहता---क्विंटल35000100007500
नाशिकहायब्रीडक्विंटल1365001350010000
कल्याणहायब्रीडक्विंटल3100001200011000
धाराशिवकागदीक्विंटल76500100008250
सोलापूरलोकलक्विंटल222000101006500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल10600070006500
पुणेलोकलक्विंटल26450060003200
नागपूरलोकलक्विंटल40700075007375
मुंबईलोकलक्विंटल736250040003250
भुसावळलोकलक्विंटल1090001170010000
टॅग्स :बाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डभाज्या