गावरान जांभूळ बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडते. मात्र, काळाभोर रानमेवा असलेला जांभूळ हंगामपूर्व मार्केटयार्ड फळ बाजारात रविवारी दाखल झाला आहे. श्रीगोंदा अहमदनगर येथील जांभूळ शेतकरी संपत कोथिंबिरे यांनी प्रथमच मार्केटयार्ड फळ बाजारात ५ किलो जांभळाची पेटी दाखल केली. ग्राहकांनीही जांभूळ खरेदीसाठी उत्सुकता दर्शवली.
फळ व्यापारी माऊली सुपेकर यांनी जांभूळ फळाचा चांगला व्यापार व्हावा म्हणून या पेटीची प्रथम पुजा करून स्वागत केले. हगांमपूर्व जांभूळ दाखल झाल्याने ६०० रुपये किलोप्रमाणे मुकिंदा फ्रुट्स (वडगावशेरी) यांनी खरेदी केली. जांभूळ आकाराने मोठा असून, चवीला गोड असल्याने खरेदी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
जांभळांचा हंगाम दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होतो. मात्र, रविवारी अहमदनगर जिल्ह्यातून ५ किलोची पहिलीच पेटी दाखल झाली आहे. जांभूळ गुणकारी असल्याने सर्वत्र चांगली मागणी आहे. यंदा शेतकऱ्यांना सुरुवातीला चांगला दर मिळत आहे. - माऊली सुपेकर, फळ व्यापारी