Lokmat Agro >बाजारहाट > आज किती मिळाला सोयाबीनला दर?

आज किती मिळाला सोयाबीनला दर?

maahrashtra agriculture farmer market yard todays soybean rates detail | आज किती मिळाला सोयाबीनला दर?

आज किती मिळाला सोयाबीनला दर?

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.  तर राज्यातील काही शेतकरी संघटनांकडून सरकारविरोधात आंदोलने सुरू आहेत. आज पणन मंडळाच्या अधिकृत  माहितीनुसार कोणत्याच  बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभावाएवढा दर मिळालेला नाही.

दरम्यान, आज केवळ सिल्लोड, जळकोट, वरोरा-शेगाव आणि औसा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे लिलाव पार पडल्याची माहिती आहे. तर या बाजार समितीमध्ये पांढरा आणि पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. वरोरा शेगाव बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ४ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या ठिकाणी केवळ ५४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

तर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा औसा बाजार समितीमध्ये ४ हजार ५१०  रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. या ठिकाणी केवळ ८३५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर सिल्लोड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ९  क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. 

आजचे सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/02/2024
सिल्लोड---क्विंटल9430044004400
जळकोटपांढराक्विंटल461420046004400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल54400040004000
औसापिवळाक्विंटल835430145444510

Web Title: maahrashtra agriculture farmer market yard todays soybean rates detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.