सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. तर राज्यातील काही शेतकरी संघटनांकडून सरकारविरोधात आंदोलने सुरू आहेत. आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कोणत्याच बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभावाएवढा दर मिळालेला नाही.
दरम्यान, आज केवळ सिल्लोड, जळकोट, वरोरा-शेगाव आणि औसा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे लिलाव पार पडल्याची माहिती आहे. तर या बाजार समितीमध्ये पांढरा आणि पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. वरोरा शेगाव बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ४ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या ठिकाणी केवळ ५४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
तर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा औसा बाजार समितीमध्ये ४ हजार ५१० रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. या ठिकाणी केवळ ८३५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर सिल्लोड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ९ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती.
आजचे सोयाबीनचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
18/02/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 9 | 4300 | 4400 | 4400 |
जळकोट | पांढरा | क्विंटल | 461 | 4200 | 4600 | 4400 |
वरोरा-शेगाव | पिवळा | क्विंटल | 54 | 4000 | 4000 | 4000 |
औसा | पिवळा | क्विंटल | 835 | 4301 | 4544 | 4510 |