मागचे दोन ते अडीच महिने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. गारपीट, दुष्काळ अन् अतिवृष्टीतून वाचवत डोळ्यात तेल घालून पिकवलेला कापूस मातीमोल दराने विक्री करावा लागत आहे. लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर झाला असताना साडेपाच हजारांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाले असून मागच्या दोन वर्षांपासून कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांवर हे मोठे संकट आहे.
दरम्यान, आज एच-४ मध्यम स्टेपल, लोकल, मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये मारेगाव, देऊळगाव राजा, वर्धा, सिंदी सेलू या बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त कापसाची आवक झाली होती. तर अकोला बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ३४ क्विंटल कापसाची आवक झाली होती. नेर परसोपंत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ५ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
तर सिंदी-सेलू या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला असून येथे ६ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला. येथे १ हजार २१० क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर ७ हजार ५ रूपये हा येथील कमाल दर होता. महाराष्ट्रात सीसीआय आणि पणन महामंडळाकडून व्यवस्थित कापूस खरेदी होत नसल्यानेही शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे.
आजचे सविस्तर कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/02/2024 | ||||||
मारेगाव | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 1248 | 6650 | 6850 | 6750 |
पारशिवनी | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 720 | 6550 | 6700 | 6650 |
अकोला | लोकल | क्विंटल | 34 | 7000 | 7000 | 7000 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 123 | 6400 | 6580 | 6500 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 2780 | 6300 | 6940 | 6750 |
नेर परसोपंत | लोकल | क्विंटल | 88 | 5600 | 5600 | 5600 |
काटोल | लोकल | क्विंटल | 155 | 6400 | 6700 | 6600 |
हिंगणा | लोकल | क्विंटल | 88 | 6250 | 6725 | 6650 |
वर्धा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1750 | 6500 | 7000 | 6750 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1210 | 6650 | 7005 | 6850 |
फुलंब्री | मध्यम स्टेपल | क्विंटल | 285 | 6650 | 6800 | 6700 |