Lokmat Agro >बाजारहाट > कापसाला किती मिळतोय दर?

कापसाला किती मिळतोय दर?

maharashtra agriculture farmer cotton market rate market yard | कापसाला किती मिळतोय दर?

कापसाला किती मिळतोय दर?

राज्यभरातील कापसाच्या दराची स्थिती जाणून घ्या

राज्यभरातील कापसाच्या दराची स्थिती जाणून घ्या

शेअर :

Join us
Join usNext

कांदा, सोयाबीननंतर सध्या कापसाचे दरही कमी झाले असून आजच्या पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज केवळ एका बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर इथर बाजार समित्यांमध्ये चक्क ७ हजारांपेक्षा कमी दर कापसाला मिळाला. त्यातच केंद्र सरकारकडून कापसांच्या गाठीची आयात झाल्यामुळे कापसाचे दर कमीच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. आज मध्यम स्टेपल, लांब स्टेपल, लोकल, ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, एकेए -८४०१ - मध्यम स्टेपल या कापसाची आवक बाजारात झाली होती. त्यामध्ये हिंगणघाट येथे आजच्या दिवसातील विक्रमी ७ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी किमान ६ हजार तर कमाल ७ हजार १७० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. हिंगणघाट बाजार समितीमध्ये ६ हजार ५०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. 

आज अकोला बोरगावमंजू येथे सर्वांत जास्त ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून ७ हजार ४०० रूपये कमाल दर मिळाला. तर संगमनेर बाजार समितीमध्ये ६ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. हा आजच्या दिवसातील राज्यातील सर्वांत कमी सरासरी दर होता.

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/12/2023
संगमनेर---क्विंटल100550068006150
राळेगाव---क्विंटल4000650070206900
भद्रावती---क्विंटल602680070206910
हिंगणाएकेए -८४०१ - मध्यम स्टेपलक्विंटल9665066506650
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल364600069006600
अकोलालोकलक्विंटल126553070216275
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल91710074007250
उमरेडलोकलक्विंटल274640068706650
देउळगाव राजालोकलक्विंटल2990660071456900
वरोरालोकलक्विंटल4502645070606800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल2122645071006850
काटोललोकलक्विंटल85650068506700
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1215655070456900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8000600071706500
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल176660068006700

Web Title: maharashtra agriculture farmer cotton market rate market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.