Lokmat Agro >बाजारहाट > पांढऱ्या सोन्याचे दर काही वाढेनात!

पांढऱ्या सोन्याचे दर काही वाढेनात!

maharashtra agriculture farmer cotton production market yard rate | पांढऱ्या सोन्याचे दर काही वाढेनात!

पांढऱ्या सोन्याचे दर काही वाढेनात!

सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 

सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या अनेक दिवसांपासून शेतकरी कापसाचे दर वाढण्याच्या प्रतिक्षेत आहेत पण कापसाचे दर स्थिर आहेत. लांब धाग्याच्या कापसासाठी केंद्र सरकारने ७ हजार २० रूपये दर निश्चित केला असतानाही त्यापेक्षा कमी दरात कापूस खरेदी केला जात असल्याचं चित्र राज्यात आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 

दरम्यान, आजच्या राज्यभरातील कापूस दराचा विचार केला तर फक्त दोन बाजार समित्यामध्ये ७ हजारांपेक्षा जास्त तर तीन बाजार समित्यांमध्ये ७ हजार रूपयांचा दर कापसाला मिळाला आहे. आजचा सर्वाधिक सरासरी दर हा ७ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. तर सर्वांत कमी दर ६ हजार ५४४ रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. 

आज नवापूर आणि बारामती बाजार समितीत सर्वांत कमी किमान दर मिळाला आहे. या बाजार समित्यांमध्ये केवळ ५ हजार ५०० रूपये दर मिळालाय. तर हिंगणघाट आणि सिंधी (सेलू) बाजार समितीमध्ये सर्वाधिक ७ हजार २८५ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. राळेगाव बाजार समितीमध्ये सर्वाधिक ३ हजार ७०० क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादन कमी झालं असतानाही कापसाचे दर स्थिर असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर जानेवारीच्या नंतर दर वाढण्याची शक्यता असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना तोपर्यंत कापूस साठवून ठेवणे शक्य नसल्याने मिळेल त्या दरात कापूस विक्री होताना दिसत आहे. 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/12/2023
सावनेर---क्विंटल2500685068756875
नवापूर---क्विंटल4550055005500
राळेगाव---क्विंटल3700660071957000
भद्रावती---क्विंटल39680070506925
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल267670069006800
अकोलालोकलक्विंटल18700070007000
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल102695075007000
उमरेडलोकलक्विंटल150670070006800
देउळगाव राजालोकलक्विंटल600700071707075
वरोरालोकलक्विंटल1121640072006800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल428580071716800
काटोललोकलक्विंटल30670070006900
हिंगणालोकलक्विंटल10650066006544
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल414690072857150
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल32550067516700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2000660072856900
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल815681071006920
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल110690071007000

Web Title: maharashtra agriculture farmer cotton production market yard rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.