दिवसेंदिवस कापसाचे दर कमी होत असून हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना कापूस विक्री करावा लागत आहे. केंद्र सरकारने कापसाच्या गाठी आयात केल्यामुळे कापसाचे दर कमी होण्याचा पोषक वातावरण तयार झालं आहे असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान, आज राज्यामध्ये केवळ एका ठिकाणी हमीभावा एवढा सरासरी दर मिळाला आहे. अकोला येथे ७ हजार २० रूपये तर संगमनेर येथे केवळ ६ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्यानंतर पुलगाव आणि वरोरा-खांबाडा येथे अनुक्रमे ६ हजार ९५० आणि ६ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
आज लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची बाजारात आवक झाली होती. पुलगाव येथे सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ५० क्विंटल कापसाची आवक झाली होती. अनेक व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करत असल्याने ते कमी दरात खरेदी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
आजचे राज्यांतर्गत कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
25/12/2023 | ||||||
संगमनेर | --- | नग | 135 | 5500 | 7000 | 6250 |
अकोला | लोकल | क्विंटल | 68 | 7000 | 7025 | 7020 |
वरोरा | लोकल | क्विंटल | 3587 | 6300 | 7060 | 6700 |
वरोरा-खांबाडा | लोकल | क्विंटल | 1784 | 6600 | 7100 | 6800 |
काटोल | लोकल | क्विंटल | 75 | 6500 | 6850 | 6650 |
पुलगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 5050 | 6500 | 7200 | 6950 |