Join us

वर्षाच्या पहिल्याच दिवशी पांढऱ्या सोन्यानी केली नाराजी! जाणून घ्या आजचे कापसाचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 7:53 PM

आजचे कापसाचे सविस्तर दर

नव्या वर्षाचा आजचा पहिला दिवस असून मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्याच दिवशी कापसाच्या दराने निच्चांकी गाठली आहे. केंद्र सरकारच्या कापूस गाठींच्या आयातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असून मातीमोल दराने शेतमाल विकावा लागत आहे. लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये हमीभाव मिळाला असतानाही पणन मंडळाच्या आजच्या उपलब्ध माहितीनुसार केवळ ५ हजार ८५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज लोकल, मध्यम स्टेपल, लांब स्टेपल, एचकेएच - ४ - मध्यम स्टेपल, एच -४- मध्यम स्टेपल या कापसाची आवक बाजारात झाली होती. त्यामध्ये ५ हजार ८५० रूपये सरासरी दर हा संगमनेर बाजार समितीत मिळाला. तर पुलगाव बाजार समितीमध्ये ६ हजार ९५० रूपये प्रतिक्विंटल एवढा आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला. 

विशेष म्हणजे आज एकाही बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला नाही. त्यामुळे नव्या वर्षाचा पहिला दिवस शेतकऱ्यांसाठी नाराजीचा किंवा निराशाजनक ठरला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील आणि या हंगामातील कापूस साठवून ठेवला आहे पण दर नसल्याने तो बाजारात काढला जात नाही. येणाऱ्या काळात कापसाला चांगला दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे. 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/01/2024
संगमनेर---क्विंटल100550068005850
सावनेर---क्विंटल1500675067756775
नवापूर---क्विंटल292600061506105
भद्रावती---क्विंटल435675070206885
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल390600069006700
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल580675068256800
अकोलालोकलक्विंटल142502070006010
उमरेडलोकलक्विंटल338660068506750
देउळगाव राजालोकलक्विंटल3100660070856900
काटोललोकलक्विंटल155600068256750
हिंगणालोकलक्विंटल10606765006500
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल700655070706920
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल6050650071056950
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड