कापसाच्या दराने तळ गाठला असून सोयाबीन आणि कांदा दरही घटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतही मिळताना दिसत नाही. जे व्यापारी किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने कापसाची खरेदी करतील अशा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सीसीआयकडून संथ गतीने कापसाची खरेदी सुरू असून राज्य पणन महासंघाने कापसाची खरेदी सुरू केली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.
दरम्यान, आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, एच-४ - मध्यम स्टेपल, लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये सिंदी-सेलू, हिंगणघाट, देऊळगाव राजा आणि सावनेर या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आवक झाली होती.
इतर बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा कमी कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये ६ हजार ९९७ रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. या ठिकाणी केवळ १४४ क्विंटल कापसाची आवक झाली होती.
तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा आष्टी वर्धा बाजार समितीमध्ये मिळाला असून येथे शेतकऱ्यांना केवळ ५ हजार ५५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ १५० क्विंटल कापसाची आवक झाली होती. आज ६ हजार ३०० ते ६ हजार ८०० रूपयांच्या दरम्यान कापसाला सरासरी दर मिळाला आहे.
आजचे सविस्तर कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
07/02/2024 | ||||||
सावनेर | --- | क्विंटल | 3500 | 6650 | 6650 | 6650 |
घणसावंगी | --- | क्विंटल | 220 | 5900 | 6900 | 6800 |
धारणी | ए.के.एच. ४ - लांब स्टेपल | क्विंटल | 150 | 5500 | 5600 | 5550 |
आष्टी (वर्धा) | ए.के.एच. ४ - लांब स्टेपल | क्विंटल | 503 | 6000 | 6700 | 6500 |
पारशिवनी | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 852 | 6500 | 6700 | 6600 |
अकोला | लोकल | क्विंटल | 113 | 6780 | 7011 | 6895 |
अकोला (बोरगावमंजू) | लोकल | क्विंटल | 144 | 6800 | 7195 | 6997 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 761 | 6300 | 6610 | 6450 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 3961 | 6200 | 6900 | 6800 |
काटोल | लोकल | क्विंटल | 285 | 5400 | 6700 | 6600 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 8000 | 6000 | 6985 | 6300 |
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 197 | 6030 | 6710 | 6320 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 3360 | 6550 | 6920 | 6850 |