शेतकऱ्यांसाठी पांढरं सोनं म्हणजे अर्थातच कापूस. यंदा कापसाचे दराने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. लांब स्टेपल कापसासाठी केंद्र सरकारने केवळ ७ हजार २० रूपये दर जाहीर केला असून हे दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला आहे. पण कापसाचे दर अजूनही कमीच असल्याने शेतकऱ्यांना मातीमोल दरात कापूस विक्री करावा लागत आहे.
दरम्यान, आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दोन बाजार समित्यामध्ये आज कापसाची आवक झाली होती. वरोरा आणि वरोरा खांबाडा बाजार समित्यामध्ये लोकल कापसाची आवक झाली होती. तर दोन्ही बाजार समित्यांमध्ये ६ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. वरोरा बाजार समितीमध्ये २ हजार ३८२ क्विंटल आवक तर वरोरा खांबाडा बाजार समितीमध्ये १ हजार ५० क्विंटल कापसाची आवक झाली होती.
दोन्ही बाजार समितीमधील सरासरी दराचा विचार केला तर हमीभावापेक्षा ३०० ते ४०० रूपये कमी दर मिळाला आहे. मकरसंक्रांतीच्या तोंडावरही कापसाच्या दराची ही स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
आजचे सविस्तर कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
14/01/2024 | ||||||
वरोरा | लोकल | क्विंटल | 2382 | 6400 | 6950 | 6700 |
वरोरा-खांबाडा | लोकल | क्विंटल | 1050 | 6550 | 6910 | 6700 |