Join us

सोयाबीनच्या दरात घट! जाणून घ्या आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 9:00 PM

आज राज्यभरात सोयाबीनला किती मिळाला दर

चालू वर्षातील सोयाबीनच्या दरातील घसरण चालूच आहे. मागच्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सोयाबीनचे दर घसरण्यास सुरूवात झाली होती ती आता ४ हजारांच्या खाली आली आहे. आज सर्वांत कमी दर हा केवळ ३ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. तर सर्वसाधारणपणे ४ हजार ते ४ हजार ६०० रूपयांपर्यंत सरासरी दर मिळताना दिसत आहेत. 

दरम्यान, आज लोकल, पांढरा आणि पिवळा या वाणाच्या सोयाबीनची बाजारात आवक झाली होती. तर अमरावती बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त ४ हजार ५८५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज मुखेड बाजार समितीमध्ये ४ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी सरासरी दर होता. तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये ३ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी दर होता.

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/01/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल350300046504600
बार्शी---क्विंटल94465046754650
कारंजा---क्विंटल1200445046904565
तुळजापूर---क्विंटल180462546254625
अमरावतीलोकलक्विंटल4585455046314590
नागपूरलोकलक्विंटल437420045424457
हिंगोलीलोकलक्विंटल825430047034501
कोपरगावलोकलक्विंटल132382046364575
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल6330045164200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल337398046364591
जालनापिवळाक्विंटल2651425047004550
अकोलापिवळाक्विंटल3470420046754600
आर्वीपिवळाक्विंटल110405045004250
चिखलीपिवळाक्विंटल806435047514550
हिंगणघाटपिवळाक्विंटल1831280048153800
वाशीमपिवळाक्विंटल3000450046504600
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600445046504550
उमरेडपिवळाक्विंटल1346350047004450
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1000440046154500
भोकरदनपिवळाक्विंटल40470048004750
भोकरपिवळाक्विंटल40457045704570
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल255450045804540
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल600444046554555
मलकापूरपिवळाक्विंटल327430045904450
वणीपिवळाक्विंटल14440044004400
सावनेरपिवळाक्विंटल17430043004300
जामखेडपिवळाक्विंटल25420047004450
गेवराईपिवळाक्विंटल58445545254490
तेल्हारापिवळाक्विंटल400440046004570
देउळगाव राजापिवळाक्विंटल2455045504550
वरोरापिवळाक्विंटल189430044504400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल30400044004200
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल96385044704200
तळोदापिवळाक्विंटल3440045814500
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1459245924592
आंबेजोबाईपिवळाक्विंटल160467947094690
औराद शहाजानीपिवळाक्विंटल384465046794660
मुखेडपिवळाक्विंटल24465048004800
हिमायतनगरपिवळाक्विंटल32440046004500
मुरुमपिवळाक्विंटल190447545264501
सेनगावपिवळाक्विंटल156430046004500
उमरखेडपिवळाक्विंटल100460046504620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल50460046504620
पुलगावपिवळाक्विंटल31371043704200
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल368400046004460
देवणीपिवळाक्विंटल20472747584742
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीन