केळीच्या दरात मागच्या काही महिन्यात चढउतार होताना दिसत आहेत. तर अनेक शेतकरीकेळी बागातच विक्री करत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील व्यापारीसुद्धा थेट शेतकऱ्यांच्या बागाला भेट देऊन, मालाची प्रत पाहून दर ठरवत असतात. अनेकदा शेतकऱ्यांना बाजारस्थिती धोक्यात असल्याचं सांगून व्यापाऱ्यांकडून दर पाडले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. सध्याची बाजारस्थिती पाहिली तर ५०० रूपये ते ५ हजार ५०० रूपयांपर्यंत केळीला दर मिळत आहे.
दरम्यान, आज भुसावळी, लोकल या केळीची आवक बाजार समित्यांमध्ये झाली होती. त्यापैकी सर्वांत कमी दर हा नागपूर बाजार समितीमध्ये ५२५ रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला. तर सर्वांत जास्त सरासरी दर हा मुंबई फ्रुट मार्केटमध्ये ५ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. तर सरासरी दर २० ते २५ रूपयांच्या आसपास सुरू असल्याची माहिती आहे. केळीची प्रत चांगली असली तर दर वाढतो. अनेक शेतकरी निर्यातीसाठी केळी पिकवत असल्याने त्यांना चांगला दर मिळतो.
आजचे केळीचे सविस्तर दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
09/01/2024 | ||||||
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 500 | 4500 | 6500 | 5500 |
नाशिक | भुसावळी | क्विंटल | 290 | 1000 | 1600 | 1300 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 41 | 1500 | 5000 | 3250 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 11 | 450 | 550 | 525 |