Join us

कापसाच्या दराने गाठली निच्चांकी; प्रतिक्विंटल केवळ ५ हजारांचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 7:35 PM

आज एकाही ठिकाणी हमीभावाएवढा दर मिळाला नाही

आज देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. पण याच दिवशी यंदाच्या हंगामातील कापसाच्या दराने निच्चांकी निच्चांकी गाठली आहे. आज नेर परसोपंत बाजार समितीमध्ये केवळ ५ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल कापसाची आवक बाजार समित्यांमध्ये झाली होती. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर हा नेर परसोपंत बाजार समितीमध्ये ५ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून येथे केवळ २६ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक ६ हजार ९७६ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.  या बाजार समितीमध्ये १६३ क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आज पुलगाव, हिंगणघाट, सिंदी सेलू, देऊळगाव राजा, उमरखेड बाजार समित्यांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. तर नेर परसोपंत आणि हिंगणा बाजार समितीमध्ये सर्वांत मी म्हणजे प्रत्येकी २६ आणि ३२ क्विंटल कापसाची आवक झाली होती.

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/02/2024
अमरावती---क्विंटल64650066006550
भद्रावती---क्विंटल509640065006450
अकोलालोकलक्विंटल111690070006950
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल163680071536976
उमरेडलोकलक्विंटल1908350045504200
देउळगाव राजालोकलक्विंटल5163610068206650
नेर परसोपंतलोकलक्विंटल26500050005000
काटोललोकलक्विंटल271540067506700
हिंगणालोकलक्विंटल32625067006700
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2110655069206800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10000600069306300
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल7450600069516750
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल160665067506700
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूसबाजार