Join us

कापसाला बाजार समित्यांत किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:50 PM

आजचे कापसाचे सविस्तर दर

यंदा देशांतर्गत कापसाचे उत्पादन घटले आहे. भारतात कापसाची आवकही होत आहे पण शेतकऱ्यांच्या कापसाला दर मिळत नसल्याचं चित्र आहे. सध्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ७ हजार २० रूपये यापेक्षाही कमी दर मिळताना दिसत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात दर मिळतील या अनुषंगाने कापूस साठवून ठेवला आहे. पण कापूस दर वाढतील की नाही हे येणारा काळच ठरवेल...

दरम्यान, आज पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीनुसार आज ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, एच-४ - मध्यम स्टेपल, लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल, वरलक्ष्मी - मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. यामध्ये केवळ दोन बाजार समित्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त दर मिळाला असून इतर बाजार समित्यांमध्ये ७ हजारांपेक्षा कमी दर मिळाला आहे. 

मनवत आणि अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार २० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर आष्टी वर्धा येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ६ हजार ६९४ क्विंटल कापसाची आवक झाली होती. हिंगणघाट येथे आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. येथे केवळ ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.  

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/01/2024
सावनेर---क्विंटल3300675067506750
भद्रावती---क्विंटल1192680069706885
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल6694600067006550
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल810677568506800
अकोलालोकलक्विंटल370688069806900
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल124680072507025
उमरेडलोकलक्विंटल708650068406700
मनवतलोकलक्विंटल4400600070707025
देउळगाव राजालोकलक्विंटल1500620069606800
वरोरालोकलक्विंटल3333660068416700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल2000650068506700
नेर परसोपंतलोकलक्विंटल45605060506050
काटोललोकलक्विंटल216630068206700
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1830665070206890
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4000600071456500
यावलमध्यम स्टेपलक्विंटल53603068106620
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल53660067006650
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5825620070656900
भिवापूरवरलक्ष्मी - मध्यम स्टेपलक्विंटल340660068106705
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड