Lokmat Agro >बाजारहाट > आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर!

आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर!

maharashtra agriculture farmer market yard cotton rate market price | आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर!

आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर!

जाणून घ्या आज कुठे आणि किती मिळाला कापसाला हमीभाव

जाणून घ्या आज कुठे आणि किती मिळाला कापसाला हमीभाव

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या दोन महिन्यापासून  कापसाच्या दराने निच्चांकी गाठली असून राज्यभरात कुठेच हमीभाव मिळताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस मातीमोल दराने विक्री करावा लागत आहे. तर अनेक बाजार समित्यांमधील कापसाची आवकही कमी झाल्याची दिसत आहे. सध्या सरासरी दराचा विचार केला तर ६ हजार ४०० ते ६ हजार ८०० रूपयांच्या मध्ये दर मिळत आहे. 

दरम्यान, आज ए.के.एच. ४ - मध्यम स्टेपल, लोकल, मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. यामध्ये सावनेर, देऊळगाव राजा, वरोरा-खांबाडा, वर्धा, सिंदी-सेलू या बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये देऊळगावा राजा येथे सर्वांत जास्त ४ हजार १९५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीनुसार आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर हा अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये ६ हजार ९४७ रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. या ठिकाणी केवळ १५८ क्विंटल कापसाची  आवक झाली होती. 

तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा नेर परसोपंत बाजार समितीमध्ये ५ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला. येथे केवळ १८ क्विंटल कापसाची आवक झाली होती. सध्या कापसाच्या दराची ही स्थिती पाहून शेतकरी हतबल झाले असून सरकारकडून कोणताही आधार शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. सीसीआय आणि पणन महासंघाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना आधार नसल्याने शेतकरी संतप्त  झाले आहेत.

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/02/2024
सावनेर---क्विंटल3500665066506650
भद्रावती---क्विंटल456620066506425
पांढरकवडाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल398662067006650
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल892665068506750
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल656660067006650
अकोलालोकलक्विंटल105673070006865
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल158670071956947
उमरेडलोकलक्विंटल496630066606450
देउळगाव राजालोकलक्विंटल4195620069506800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1247600066506400
नेर परसोपंतलोकलक्विंटल18560056005600
काटोललोकलक्विंटल324540067006650
हिंगणालोकलक्विंटल36640066006500
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल2450635069206600
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल146645065506500
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2010650069206850
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल162665067506700

Web Title: maharashtra agriculture farmer market yard cotton rate market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.