Join us

आज कापसाला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 7:24 PM

जाणून घ्या आजचे कापसाचे सविस्तर दर

मागच्या एका महिन्यापासून जास्त दिवस कापसाच्या दराला उतरती कळा लागली असून एका क्विंटलमागे शेतकऱ्यांना १ हजार ते १ हजार २०० रूपयांपर्यंतचा फटका सहन करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांनी दर वाढतील या आशेने कापूस साठवून ठेवला आहे पण दर खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

दरम्यान, आज ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, एच-४ - मध्यम स्टेपल, लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल कापसाची बाजारात आवक झाली होती. तर पणन मंडळाच्या अधिकृत आणि अद्ययावत  माहितीनुसार आज हिंगणघाट येथे सर्वांत जास्त म्हणजे ९ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये ६ हजार ४०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. 

आज परभणी बाजार समितीमध्ये कापसाला ७ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून आजच्या दिवसातील हा उच्चांकी सरासरी दर होता. तर नेर परसोपंत बाजार समितीमध्ये केवळ ५ हजार ८०० रूपये सरासरी दर मिळाला असून आजच्या दिवसातील हा निच्चांकी सरासरी दर होता. हा दर हमीभावापेक्षा १ हजार २०० रूपयांनी कमी आहे.

जाणून घ्या आजचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2024
अमरावती---क्विंटल50660067256662
सावनेर---क्विंटल3000675067756775
भद्रावती---क्विंटल779642069706695
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल392600068006675
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल430675068256800
अकोलालोकलक्विंटल1383690071306920
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल135680071506975
उमरेडलोकलक्विंटल876650068706650
देउळगाव राजालोकलक्विंटल3821600069406700
वरोरालोकलक्विंटल2447615068256600
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1936630068206600
नेर परसोपंतलोकलक्विंटल27580058005800
हिंगणालोकलक्विंटल39670069006850
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1535655070256900
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल6300063006300
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल2100702071007050
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9500600071456400
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल125665067006675
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड