Lokmat Agro >बाजारहाट > आज कांद्याला केवळ साडेसात रूपये किलोचा भाव

आज कांद्याला केवळ साडेसात रूपये किलोचा भाव

maharashtra agriculture farmer market yard onion rate today | आज कांद्याला केवळ साडेसात रूपये किलोचा भाव

आज कांद्याला केवळ साडेसात रूपये किलोचा भाव

जाणून घ्या राज्यभरातील कांद्याचे सविस्तर दर

जाणून घ्या राज्यभरातील कांद्याचे सविस्तर दर

शेअर :

Join us
Join usNext

केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली असून शेतकऱ्यांना एका किलो कांद्यासाठी केवळ साडेसात रूपये मिळत असल्याचं समोर आली आहे. पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीनुसार आज पुणे-मोशी बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ७५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. निर्यातशुल्कात वाढ, त्यानंतर निर्यातबंदी यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. 

दरम्यान, आज उन्हाळी, लोकल, लाल, चिंचवड या कांद्याची आवक बाजारात झाली होती. त्यामध्ये आज पुणे बाजार समितीमध्ये २५ हजार ३४७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर येथे केवळ १ हजार १५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. त्यापाठोपाठ पारनेर, जुन्नर - आळेफाटा आणि मंचर बाजार समितीमध्ये जास्त कांद्याची आवक झाली होती. आज जुन्नर - ओतूर बाजार समितीमध्ये १ हजार ८०० रूपये सरासरी दर मिळाला असून आजच्या दिवसातील हा उच्चांकी दर होता. 

भुसावळ बाजार समितीमध्ये १ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. तर उद्या (सोमवारी) आयोध्या येथे रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार असल्याने राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक बाजार समित्यांना सुट्टी असणार आहे. तर आज रविवार असल्याने अनेक बाजार समित्या बंद होत्या. 

जाणून घ्या आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/01/2024
मंचर---क्विंटल1153080017001250
दौंड-केडगाव---क्विंटल211050020001500
जुन्नरचिंचवडक्विंटल41670016001200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1695580021101700
कोपरगावलालक्विंटल966050014001260
पारनेरलालक्विंटल2451320018001350
भुसावळलालक्विंटल8860012001000
राहतालालक्विंटल122250016001300
पुणेलोकलक्विंटल2534760017001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6120012001200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल88150022001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल7493001200750
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल437050021101800

Web Title: maharashtra agriculture farmer market yard onion rate today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.