Join us

कापसाला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 7:57 PM

सात हजारांपेक्षा कमी दर कापसाला मिळत आहे.

कांदा, सोयाबीननंतर कापूस या राज्यातील सर्वांत मोठ्या पिकाचेही दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रतिक्विंटलमागे शेतकऱ्यांना २०० ते ५०० रूपयांचा तोटा सहन करावा लागत असून हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची खरेदी केली जात आहे. मागच्या एका महिन्यापासून कापसाचे दर उतरले असून थेट सात हजारांच्या खाली आले आहेत. 

दरम्यान, लांब धाग्याच्या कापसाला केंद्र सरकारकडून ७ हजार २० रूपयांचा हमीभाव देण्यात आला आहे. तरीसुद्धा हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची विक्री शेतकऱ्यांकडून होत आहे. केंद्र सरकारने कापसाच्या गाठी आयात केल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती कापसाचे दर पडण्याला कारणीभूत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

आज ६ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सर्वांत कमी सरासरी दर संगमनेर बाजार समितीत मिळाला आहे. तर भद्रावती बाजार समितीत ७ हजार ७ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. एकाही बाजार समितीत हमीभावापेक्षा जास्त दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. तर अनेक व्यापारी १०० ते २०० रूपये क्विंटलच्या पाठीमागे जास्त दर देऊन पैशांच्या वायद्यावर कापूस खरेदी करताना दिसत आहेत.  

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2023
संगमनेर---क्विंटल150550068006150
सावनेर---क्विंटल3500672567506750
भद्रावती---क्विंटल635699570207007
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल946670067756740
अकोलालोकलक्विंटल108585070006425
उमरेडलोकलक्विंटल248620069206750
देउळगाव राजालोकलक्विंटल1900620071606900
वरोरालोकलक्विंटल4224635071006800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल2263675071006850
काटोललोकलक्विंटल200640068006700
हिंगणालोकलक्विंटल42625067506650
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1600655070406920
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड