Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनच्या दराला मिळेना बूस्टर! भाव हमीभावापेक्षा हजार रूपयांनी कमी

सोयाबीनच्या दराला मिळेना बूस्टर! भाव हमीभावापेक्षा हजार रूपयांनी कमी

maharashtra agriculture farmer market yard price rate of soybean | सोयाबीनच्या दराला मिळेना बूस्टर! भाव हमीभावापेक्षा हजार रूपयांनी कमी

सोयाबीनच्या दराला मिळेना बूस्टर! भाव हमीभावापेक्षा हजार रूपयांनी कमी

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

शेअर :

Join us
Join usNext

केंद्र सरकारने ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल हमीभाव सोयाबीनला जाहीर केलेला असताना अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री होत आहे. तर दर नसल्याने सोयाबीनची साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत. सध्या सोयाबीनला बाजारात ४ हजार ते ४ हजार ६०० रूपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळत आहे. तर ठराविक आणि मोठ्या बाजार समित्या सोडल्या तर अनेक बाजार समित्यांमधील सोयाबीनची आवक कमी झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे.  

दरम्यान, आज लोकल, हायब्रीड, पांढरा, पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये सर्वांत जास्त आवक ही लातूर बाजार समितीमध्ये ९ हजार ५०३ क्विंटल झाली होती. या ठिकाणी ४ हजार ६५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. त्याचबरोबर मेहकर, जालना, अकोला, हिंगणघाट, चिखली बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली होती. 

आज वडूज बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ८०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ २० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ६०० रूपये सरासरी दर मिळाला असून हा दर सोयाबीनच्या हमीभावापेक्षा तब्बल १ हजार रूपयांनी कमी आहे. हिंगणघाट येथे आज २ हजार २७५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल190300046254550
बार्शी---क्विंटल200460046504600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल47430045004417
राहूरी -वांबोरी---क्विंटल50400045004300
पाचोरा---क्विंटल250450045304521
रिसोड---क्विंटल2090426045854410
लोहा---क्विंटल44443046614631
तुळजापूर---क्विंटल120460046004600
धुळेहायब्रीडक्विंटल23451545154515
अमरावतीलोकलक्विंटल6789445045364493
नागपूरलोकलक्विंटल1304420045004425
अमळनेरलोकलक्विंटल30440044504450
हिंगोलीलोकलक्विंटल900421046404425
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल37390046264051
मेहकरलोकलक्विंटल1970400045654300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल206350046124590
वडूजपांढराक्विंटल20470049004800
बारामतीपिवळाक्विंटल114350046004570
लातूरपिवळाक्विंटल9503460147294650
जालनापिवळाक्विंटल4980420046114525
अकोलापिवळाक्विंटल4955415045904500
मालेगावपिवळाक्विंटल20406045114485
आर्वीपिवळाक्विंटल262400044954350
चिखलीपिवळाक्विंटल1510427546004437
हिंगणघाटपिवळाक्विंटल2275260046103600
पैठणपिवळाक्विंटल7444144414441
भोकरदनपिवळाक्विंटल35460048004700
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल172445045754512
जिंतूरपिवळाक्विंटल13455645714556
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल750434045804495
मलकापूरपिवळाक्विंटल840300045404455
सावनेरपिवळाक्विंटल7446744754475
तेल्हारापिवळाक्विंटल30440045504510
देउळगाव राजापिवळाक्विंटल15400045794450
वरोरापिवळाक्विंटल244200044904200
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल5410041004100
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल251400044704200
किल्ले धारुरपिवळाक्विंटल4450045004500
औराद शहाजानीपिवळाक्विंटल321457446304602
मुरुमपिवळाक्विंटल135442545104468
सेनगावपिवळाक्विंटल226425045004400
पुर्णापिवळाक्विंटल100440046754650
सिंदखेड राजापिवळाक्विंटल300460047004650
नेर परसोपंतपिवळाक्विंटल334310545754398
उमरखेडपिवळाक्विंटल120460046504620
बाभुळगावपिवळाक्विंटल355408045754450
राजूरापिवळाक्विंटल6435043504350
सिंदीपिवळाक्विंटल8041000
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल605400045004400

Web Title: maharashtra agriculture farmer market yard price rate of soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.