Join us

कापसाला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 6:10 PM

आजची कापूस बाजारस्थिती जाणून घ्या

कापूस आणि कांद्याचे दर मागच्या काही दिवसांत कमालीचे घसरले असल्याने शेतकरी हैराण आहेत. तर केंद्र सरकारने ७ हजार २० रूपये दर जाहीर केला असतानाही हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळताना दिसत आहे. तर आज हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ९ हजार ८१० क्विंटल कापसाची आवक बाजारात झाली होती.

दरम्यान, पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, एच-४ - मध्यम स्टेपल, लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल या कापसाची आवक बाजार समितीत झाली होती. अकोला बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे ३१ क्विंटल कापसाची आवक झाली. तर आज एकाही बाजार समितीमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त दर मिळाला नाही. 

आज चिमुर बाजार समितीमध्ये ६ हजार ९६१ रूपये सरासरी दर मिळाला. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर होता. तर नेर परसोपंत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ६ हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. हमीभावापेक्षा प्रतिक्विंटल एक हजार रूपये कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना पाहायला मिळत आहे.

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2024
भद्रावती---क्विंटल698673069706830
सिरोंचा---क्विंटल582660070206700
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल438600068506650
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल456670068506800
अकोलालोकलक्विंटल31694969496949
उमरेडलोकलक्विंटल644650070106800
नेर परसोपंतलोकलक्विंटल51600060006000
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1010655070706900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9810600071956500
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल231665067506700
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1056695070016961
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल6850640071516950
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूसबाजार