Join us

सोयाबीनचे दर ४ हजारांच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 7:00 PM

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीन दर

चालू वर्षाच्या सुरूवातीलाच सोयाबीनच्या दराने मान टाकली असून सोयाबीनचे दर ४ हजारांच्या खाली आले असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. केंद्र सरकारचे सुल्तानी निर्णय या परिस्थितीला कारणीभूत असून देशाला लागणाऱ्या जवळपास ६० ते ८० टक्के खाद्यतेलाची केंद्राकडून आयात केली जात आहे. म्हणून देशांतर्गत सोयाबीन उत्पादनात घट झाली असतानाही शेतकऱ्यांना दर मिळत नाहीत. तर त्याउलट सोयाबीन तेलाची आयात केली जात असल्यामुळे यंदा  वर्षाच्या सुरूवातीलाच सोयाबीनच्या दराने मान टाकल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, आज पिवळा, पांढरा, लोकल आणि हायब्रीड या वाणाच्या सोयाबीनची आवक झाली होती. तर पणन मंडळाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर हा हिंगणघाट बाजार समितीत ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. १ हजार ३८५ क्विंटल आवक झालेल्या बाजार समितीमध्ये केवळ २ हजार ८०० रूपये किमान दर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात ४ हजारांच्या वर असलेले दर आता ४ हजारांपेक्षा खाली आले आहेत. 

आज हिंगोली बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला आहे. येथे ४ हजार ७६० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून किमान ४ हजार ५४० तर कमाल ४ हजार ९८० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आजच्या दिवसातील सरासरी दर विचारात घेतले तर ३ हजार ८०० ते ४ हजार ७०० रूपयापर्यंत सरासरी दर मिळताना दिसत आहे.

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/01/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल850300046634600
जळगाव---क्विंटल18420045504525
बार्शी---क्विंटल332460046754675
बार्शी -वैराग---क्विंटल27465046604650
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13420045294364
राहूरी -वांबोरी---क्विंटल12440145254461
सिल्लोड---क्विंटल10460047004700
उदगीर---क्विंटल2675468047074693
कारंजा---क्विंटल3500447046804590
तुळजापूर---क्विंटल150470047004700
मानोरा---क्विंटल268455046654565
मोर्शी---क्विंटल87440045004450
राहता---क्विंटल24455046654600
धुळेहायब्रीडक्विंटल5456545654565
सोलापूरलोकलक्विंटल20464547054655
अमरावतीलोकलक्विंटल4764450046214560
चोपडालोकलक्विंटल50435147524500
अमळनेरलोकलक्विंटल20440045654565
हिंगोलीलोकलक्विंटल1000454049804760
कोपरगावलोकलक्विंटल216400046584550
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल32230146283800
मेहकरलोकलक्विंटल1770420048004600
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल390390046684630
नागपूरपांढराक्विंटल238420044644398
लातूरपिवळाक्विंटल11847460048534750
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल37460047514700
जालनापिवळाक्विंटल2957430047754625
अकोलापिवळाक्विंटल1460427047354600
यवतमाळपिवळाक्विंटल463430046454472
मालेगावपिवळाक्विंटल21449946034586
आर्वीपिवळाक्विंटल311400046004350
चिखलीपिवळाक्विंटल1255430048464575
हिंगणघाटपिवळाक्विंटल1385280047303700
बीडपिवळाक्विंटल156460047114658
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600455047104650
उमरेडपिवळाक्विंटल659350046004450
चाळीसगावपिवळाक्विंटल5310046004595
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल7470048004750
भोकरपिवळाक्विंटल5450045004500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल187460046504600
जिंतूरपिवळाक्विंटल108430046254575
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1200447546654575
मलकापूरपिवळाक्विंटल840430546804570
वणीपिवळाक्विंटल42450046654600
सावनेरपिवळाक्विंटल22420043904300
जामखेडपिवळाक्विंटल27420045004350
गेवराईपिवळाक्विंटल60440046154550
परतूरपिवळाक्विंटल17466647604700
गंगाखेडपिवळाक्विंटल25480049004800
तेल्हारापिवळाक्विंटल500437545754520
देउळगाव राजापिवळाक्विंटल30460046004600
आंबेजोबाईपिवळाक्विंटल360470047514720
किल्ले धारुरपिवळाक्विंटल8450045004500
औराद शहाजानीपिवळाक्विंटल452467047004685
मुरुमपिवळाक्विंटल204430045764438
बोरी-अरबपिवळाक्विंटल112449546554605
बाभुळगावपिवळाक्विंटल380405547404550
भंडारापिवळाक्विंटल1400040004000
राजूरापिवळाक्विंटल67431044804435
काटोलपिवळाक्विंटल90436145644450
सिंदीपिवळाक्विंटल54396044004125
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीन