Join us

कापूस दरातील घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:58 PM

आज राज्यभरात कापसाला किती मिळाला दर?

कापसाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना मातीमोल दराने कापूस विक्री करावी लागत  आहे. बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षाही कमी दर मिळत  असल्याने पणन महासंघ आणि सीसीआयकडून  कापूस खरेदी सुरू करण्यात  आली आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी ही खरेदी सुरू करण्यात आली असून तिथे हमीभावाने कापूस खरेदी केला जात आहे. पण त्या अटी आणि नियमांमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, आज पणन मंडळाच्या अधिकृत  माहितीनुसार ए.के.एच. ४ - मध्यम स्टेपल, एच-४ - मध्यम स्टेपल, लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये मारेगाव,  देऊळगाव राजा,  हिंगणघाट, वर्धा आणि सिंदी-सेलू या बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटलपेक्षा जास्त कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये हिंगणघाट येथे विक्रमी ६ हजार ५०० क्विंटल कापूस आला होता. या बाजार समितीमध्ये ६ हजार ४०० रूपये  प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

तर अकोला बोरगावमंजू या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त  म्हणजे ७ हजार २७ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाल्याचं चित्र आहे. तर या ठिकाणी केवळ १३६ क्विंटल कापसाची आवक झाली होती. दरम्यान, नेर परसोपंत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत  कमी म्हणजे केवळ ५ हजार ८००  रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये ३९ क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आजचे सविस्तर कापसाचे  दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/02/2024
भद्रावती---क्विंटल480620067506475
पांढरकवडाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल860662069206800
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1409665068506750
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल584650067006600
अकोलालोकलक्विंटल115673070006865
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल136690071547027
उमरेडलोकलक्विंटल250634067006500
देउळगाव राजालोकलक्विंटल3700620069706875
नेर परसोपंतलोकलक्विंटल39580058005800
काटोललोकलक्विंटल211540067506650
हिंगणालोकलक्विंटल52600067006650
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल6500600070016400
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1910625070006650
यावलमध्यम स्टेपलक्विंटल187602066506310
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल1550660070506850
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल148665068006700
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारकापूस