Join us

Cotton Rates : आज एकाच ठिकाणी मिळाला कापसाला हमीभावाएवढा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 9:40 PM

आज राज्यभरात कापसाला किती मिळाला दर, जाणून घ्या

कापसाच्या दराने माना टाकल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सीसीआय आणि पणन महामंडळाकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील काही ठिकाणी सीसीआयकडून खरेदी सुरू करण्यात आली आहे. तर खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर दिला जात आहे. काही शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातीलही कापूस साठवून ठेवला आहे पण दर नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. 

दरम्यान, आज ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, एच-४ - मध्यम स्टेपल, मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये, सिंदू-सेलू, हिंगणघाट, वरोरा-खांबाडा, वरोरा, देऊळगाव राजा आणि सावनेर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त  कापसाची आवक झाली होती. तर हिंगणघाट  बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ८ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आजच्या कमाल आणि किमान दराचा विचार केला तर नेर परसोपंत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ५ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर या ठिकामी केवळ ८ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर म्हणजे ७ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/02/2024
सावनेर---क्विंटल3700670067006700
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल534600068006550
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल865620067006500
अकोलालोकलक्विंटल96675070006875
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल144690072017050
उमरेडलोकलक्विंटल467640067106550
देउळगाव राजालोकलक्विंटल3700630070506900
वरोरालोकलक्विंटल3036610070006500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल600650068506700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1238550068706500
नेर परसोपंतलोकलक्विंटल8550055005500
काटोललोकलक्विंटल272540067506500
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8500600071606500
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल145650066006550
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2210655070506850
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्ड