यावर्षी तुरीला चांगला दर मिळताना दिसत आहे. तर सरासरी दर हे ९ हजार ते १० हजारापर्यंत पोहोचले आहेत. काही बाजार समित्यांमध्ये तुरीला सरासरी दर हा १० हजारांपेक्षा अधिक मिळत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी समाधानी दिसून येत आहेत. तर पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज केवळ ६ बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक झाली होती.
दरम्यान, आज लाल आणि पांढरा तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये सर्वांत जास्त आवक ही जळकोट बाजार समितीमध्ये झाली होती. या बाजार समितीमध्ये ४५२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर येथे १० २५५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर होता.
तर शेवगाव आणि सिल्लोड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी ९ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दोन्ही बाजार समितीमध्ये अनुक्रमे १५ आणि ५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. सरासरी दराचा विचार केला तर राज्यात ९ हजार ३०० ते १० हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाल्याचं दिसून आलं.
आजचे तुरीचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
18/02/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 5 | 9100 | 9300 | 9300 |
औसा | लाल | क्विंटल | 75 | 9000 | 10002 | 9762 |
समुद्रपूर | लाल | क्विंटल | 3 | 9000 | 9000 | 9000 |
जळकोट | लाल | क्विंटल | 452 | 9955 | 10555 | 10255 |
शेवगाव | पांढरा | क्विंटल | 15 | 9050 | 9300 | 9300 |
औसा | पांढरा | क्विंटल | 12 | 9500 | 9801 | 9658 |