Join us

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 8:34 PM

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

मागच्या अनेक दिवसांपासून कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती पण तसे होताना दिसत नाही. बाजारात कापसाचे दर हे हमीभावाच्या आसपासच आहेत. तर अनेक ठिकाणी हमीभावापेक्षाही कमी दरात कापसाची विक्री केली जात आहे. यामुळे शेतकरी केंद्र शासनावर नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आज अकोला (बोरगावमंजू) बाजार समितीत राज्यातील सर्वांत जास्त दर मिळाला. २ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला असून ७ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला. तर आजचा सर्वांत कमी सरासरी दर हा मांढळ बाजार समितीत मिळाला. या ठिकाणी केवळ ६ हजार ४५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून ६ हजार ३५० रूपये किमान दर मिळाला. 

आज हिंगणघाट येथे सर्वांत जास्त आवक झाली होती. ३ हजार ५०० क्विंटल आवक झालेल्या या बाजार समितीत ६ हजार ७०० रूपये किमान तर ७ हजार ३२५ रूपये कमाल दर मिळाला. आज बाजारात लोकल, एच-४ - मध्यम स्टेपल    , ए.के.एच. ४ - मध्यम स्टेपल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल या प्रतीच्या कापसाची आवक झाली होती. 

आजचे सविस्तर कापसाचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/12/2023
वडवणी---क्विंटल119702571007071
पांढरकवडाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल240662069006850
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल738680069006850
अकोलालोकलक्विंटल80701170307020
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल107700075007250
उमरेडलोकलक्विंटल171650070906800
देउळगाव राजालोकलक्विंटल900705071707100
वरोरालोकलक्विंटल2464625072216800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल625585071506800
हिंगणालोकलक्विंटल14640065506450
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल622690072407100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3500670073256900
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1500680071006925
मांढळमध्यम स्टेपलक्विंटल290635067506450
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2710620074157125
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी संपकापूसशेतकरी