Lokmat Agro >बाजारहाट > वर्षाअखेर कांदा दराची काय आहे स्थिती?

वर्षाअखेर कांदा दराची काय आहे स्थिती?

maharashtra agriculture farmer onion producer farmer market yard price year end | वर्षाअखेर कांदा दराची काय आहे स्थिती?

वर्षाअखेर कांदा दराची काय आहे स्थिती?

जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

शेअर :

Join us
Join usNext

हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरलं असं म्हणायला काही हरकत नाही. कांद्याचे दर वाढीवर नियंत्रण येण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावलं उचलली. त्यामध्ये कांदा उत्पादक दाबला गेला आणि अतोनात नुकसानाला बळी पडावं लागलं. तर वर्षाच्या शेवटच्या दिवशीही शेतकऱ्याला मातीमोल दराने कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, आजच्या पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज राज्यातील केवळ एका बाजार समितीमध्ये २ हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला आहे. तर त्यानंतर जुन्नर - ओतूर बाजार समितीमध्ये २ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. ९०० रूपये प्रतिक्विंटल हा आजचा सर्वांत कमी सरासरी दर होता. 

पुणे - मोशी बाजार समितीमध्ये आज सर्वांत कमी दर मिळाला. किमान ३०० रूपये प्रतिक्विंटल तर कमाल १ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल आणि ९०० रूपये सरासरी दर येथे मिळाला. आजचे दिवसभरातील सरासरी दर हे ९०० रूपये ते १ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल यादरम्यान होते.  येणाऱ्या नव्या वर्षात शेतकऱ्यांना कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. 

 

आजचे सविस्तर कांद्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/12/2023
मंचर---क्विंटल3440130026001950
दौंड-केडगाव---क्विंटल126970021001600
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल870018001100
कोपरगावलालक्विंटल4120100019501825
पारनेरलालक्विंटल1337130025001650
भुसावळलालक्विंटल42120015001300
राहतालालक्विंटल125060023001600
पुणेलोकलक्विंटल1404780026001800
पुणे- खडकीलोकलक्विंटल4200027002350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4150015001500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल57170022001900
पुणे-मोशीलोकलक्विंटल4083001500900
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल2393100025002000

Web Title: maharashtra agriculture farmer onion producer farmer market yard price year end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.