Join us

सोयाबीनला आज किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 7:44 PM

केंद्र सरकारकडून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनसाठी ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. 

मागच्या एका महिन्यापासून सोयाबीनला मिळालेला दर विचारात घेतला तर पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात २०० ते ४०० रूपयांपर्यंत घट झाल्याचं चित्र आहे. दरम्यान, राज्यभरात ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल ते ५ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळत आहे. केंद्र सरकारकडून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनसाठी ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. 

दरम्यान, आज सर्वांधिक सरासरी दर हा तासगाव बाजार समितीत मिळाला असून ५ हजार १३० रूपये प्रतिक्विंटल या सरासरीने शेतकऱ्यांना पैसे मिळाले. तर हिंगणघाट येथे ३ हजार ८०० रूपये सरासरी दर मिळाला. हा राज्यातील सर्वांधिक कमी सरासरी दर होता. या बाजार समितीत १ हजार ३७६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर २ हजार ८०० किमान आणि ४ हजार ९०५ रूपये एवढा कमाल दर मिळाला. 

तासगाव बाजार समितीत अवघी २४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. येथे ४ हजार ८८० रूपये किमान तर ५ हजार २०० रूपये कमाल दर मिळाला. वरोरा खांबाडा येथे आज २००० रूपये एवढा सर्वांत कमी किमान दर मिळाला आहे तर तासगाव बाजार समितीत ५ हजार २०० रूपये एवढा सर्वाधिक कमाल दर मिळाला आहे. सर्वसाधारण दराचा विचार केला तर ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० रूपयांच्या दरम्यान दर होते.

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/12/2023
येवला---क्विंटल50450048014751
लासलगाव---क्विंटल516340149154870
लासलगाव - विंचूर---क्विंटल782300049674850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21475047504750
माजलगाव---क्विंटल457460049264900
राहूरी -वांबोरी---क्विंटल4450146004550
सिल्लोड---क्विंटल5470047004700
कारंजा---क्विंटल4000462048854780
वैजापूर---क्विंटल25450047504700
तुळजापूर---क्विंटल250485048504850
मानोरा---क्विंटल289455048704770
धुळेहायब्रीडक्विंटल3457547704650
सोलापूरलोकलक्विंटल43415049004840
अमरावतीलोकलक्विंटल3849475048154782
अकोलेलोकलक्विंटल50460048004700
नागपूरलोकलक्विंटल345420047504613
अमळनेरलोकलक्विंटल40450047264726
हिंगोलीलोकलक्विंटल500450049254712
कोपरगावलोकलक्विंटल74400048044776
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल12465048704716
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल191330150004890
बारामतीपिवळाक्विंटल190400048384830
लातूरपिवळाक्विंटल18027480050824970
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल120480049004850
जालनापिवळाक्विंटल2215430050254825
अकोलापिवळाक्विंटल2458425048604600
यवतमाळपिवळाक्विंटल367440048504625
आर्वीपिवळाक्विंटल400400048954650
चिखलीपिवळाक्विंटल940440049754690
हिंगणघाटपिवळाक्विंटल1376280049053800
अक्कलकोटपिवळाक्विंटल50465049754900
वाशीमपिवळाक्विंटल2400472552604865
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300455049004750
कळमनूरीपिवळाक्विंटल50500050005000
वर्धापिवळाक्विंटल107415047504520
भोकरपिवळाक्विंटल103430048124556
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल394470048004750
जिंतूरपिवळाक्विंटल9472547254725
मलकापूरपिवळाक्विंटल275460048504750
दिग्रसपिवळाक्विंटल130471548004775
वणीपिवळाक्विंटल70460049254700
सावनेरपिवळाक्विंटल131460048514750
जामखेडपिवळाक्विंटल50420048004500
शेवगावपिवळाक्विंटल18440046004400
गेवराईपिवळाक्विंटल22470049194750
परतूरपिवळाक्विंटल24480048764865
देउळगाव राजापिवळाक्विंटल45450048404700
वरोरापिवळाक्विंटल108236047214400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल21460046004600
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल100200046504400
तळोदापिवळाक्विंटल1420045004400
तासगावपिवळाक्विंटल24488052005130
आंबेजोबाईपिवळाक्विंटल210491049654930
अहमहपूरपिवळाक्विंटल1251350049304744
औसापिवळाक्विंटल1111472151025044
औराद शहाजानीपिवळाक्विंटल466488049254902
बसमतपिवळाक्विंटल219475049604750
सेनगावपिवळाक्विंटल210460048004700
पालमपिवळाक्विंटल150485148514851
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल245460048554800
बुलढाणापिवळाक्विंटल400400049004450
सिंदखेड राजापिवळाक्विंटल485460049004800
बोरी-अरबपिवळाक्विंटल73466050504925
चिमुरपिवळाक्विंटल70480050004900
राजूरापिवळाक्विंटल19470047004700
काटोलपिवळाक्विंटल135390049004400
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल143445048704725
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल521390048504710
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी