Join us

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 8:54 PM

ब्राझीलमध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे दर उतरले असल्याची शक्यता असून देशांतर्गत सोयाबीनचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. 

सोयाबीनचे दर मागच्या तीन आठवड्यामध्ये कमी कमी होताना दिसत आहेत. तर आज ख्रिसमस असल्या कारणाने अनेक बाजार समित्यांना सुट्ट्या होत्या. तर आंतरराष्ट्रीय बाजारांतील चढउतारामुळे सोयाबीनच्या दरात चढउतार दिसत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर आज सोयाबीनला संमिश्र दर मिळाल्याचं चित्र होतं. 

दरम्यान, आज ४ हजार ३०० ते ४ हजार ८१६ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर सोयाबीनला मिळाला आहे. त्याचबरोबर लातूर बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजेच ७ हजार १०८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या ठिकाणी ४ हजार ७२६ रूपये किमान तर ४ हजार ८१६ रूपये कमाल दर मिळाला. 

आज बाजारात पिवळा वाणाच्या सोयाबीनची आवक झाली होती. वरोरा आणि वरोरा-खांबाडा या बाजार समित्यांमध्ये सर्वांत कमी म्हणजे ४ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. ब्राझीलमध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे दर उतरले असल्याची शक्यता असून देशांतर्गत सोयाबीनचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/12/2023
अचलपूर---क्विंटल395450047004600
मोर्शी---क्विंटल250430046554477
राहता---क्विंटल14465047264675
लातूरपिवळाक्विंटल7108472648164775
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल78465047514700
अकोलापिवळाक्विंटल918412546804600
वरोरापिवळाक्विंटल77380045504300
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल95370045504300
औसापिवळाक्विंटल254470148414816
काटोलपिवळाक्विंटल90436046694500
पुलगावपिवळाक्विंटल55440046004500
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनबाजारमार्केट यार्ड