Lokmat Agro >बाजारहाट > आजचे सोयाबीनचे दर किती होते?

आजचे सोयाबीनचे दर किती होते?

maharashtra agriculture farmer soybean rate market yard price | आजचे सोयाबीनचे दर किती होते?

आजचे सोयाबीनचे दर किती होते?

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीन दर

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीन दर

शेअर :

Join us
Join usNext

यंदाच्या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. खरिपामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे अनेक शेतमालाचे नुकसान झाले होते. त्यानंतर शेतमालाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही. २०२३ या वर्षामध्ये केंद्राने केवळ ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर सोयाबीनला जाहीर केला.

सुरूवातील सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त आणि काही ठिकाणी हमीभावाच्या आसपास दर मिळत होता. काही ठिकाणी तर ५ हजारांच्या वर सरासरी दर मिळाला पण गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० ते ५०० रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. 

दरम्यान, आज पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार केवळ पाच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा लिलाव झाला. यामध्ये पांढरा आणि पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. तर औसा बाजार समितीमध्ये ४ हजार ७७९ रूपये प्रतिक्विंटल एवढा सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

आजचे सविस्तर सोयाबीन दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/12/2023
सिल्लोड---क्विंटल52440045204500
उदगीर---क्विंटल3150466747204693
जळकोटपांढराक्विंटल265460048004700
औसापिवळाक्विंटल1624445148114779
देवणीपिवळाक्विंटल33474647824764

Web Title: maharashtra agriculture farmer soybean rate market yard price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.