यंदाच्या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. खरिपामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे अनेक शेतमालाचे नुकसान झाले होते. त्यानंतर शेतमालाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही. २०२३ या वर्षामध्ये केंद्राने केवळ ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर सोयाबीनला जाहीर केला.
सुरूवातील सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त आणि काही ठिकाणी हमीभावाच्या आसपास दर मिळत होता. काही ठिकाणी तर ५ हजारांच्या वर सरासरी दर मिळाला पण गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० ते ५०० रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
दरम्यान, आज पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार केवळ पाच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा लिलाव झाला. यामध्ये पांढरा आणि पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. तर औसा बाजार समितीमध्ये ४ हजार ७७९ रूपये प्रतिक्विंटल एवढा सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
आजचे सविस्तर सोयाबीन दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
31/12/2023 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 52 | 4400 | 4520 | 4500 |
उदगीर | --- | क्विंटल | 3150 | 4667 | 4720 | 4693 |
जळकोट | पांढरा | क्विंटल | 265 | 4600 | 4800 | 4700 |
औसा | पिवळा | क्विंटल | 1624 | 4451 | 4811 | 4779 |
देवणी | पिवळा | क्विंटल | 33 | 4746 | 4782 | 4764 |