Lokmat Agro >बाजारहाट > उद्या रामलल्लांची प्रतिष्ठापना! आज सोयाबीनला किती मिळाला दर?

उद्या रामलल्लांची प्रतिष्ठापना! आज सोयाबीनला किती मिळाला दर?

maharashtra agriculture farmer soybean rate today market yard price ram mandir ayodhya | उद्या रामलल्लांची प्रतिष्ठापना! आज सोयाबीनला किती मिळाला दर?

उद्या रामलल्लांची प्रतिष्ठापना! आज सोयाबीनला किती मिळाला दर?

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या काही दिवसांपासून शेतमालाचे दर कमालीचे उतरले आहेत. त्यामध्ये सोयाबीन, कांदा आणि कापसाचा सामावेश आहे. या मुख्य शेतमालाला दर नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जास्तीचा दर मिळेल या हेतून साठवून ठेवला आहे. पण लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत शेतमालाचे दर वाढणार नाहीत असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

दरम्यान, आज रविवार असल्याने बऱ्याच बाजार समित्या बंद होत्या. तर सोमवारी म्हणजे उद्या आयोध्या येथे रामल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने काही बाजार समित्या बंद आहेत. आज पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार सिल्लोड आणि देवणी या दोन बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक झाली होती.  येथे प्रत्येकी ९६ आणि ४० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

सिल्लोड बाजार समितीमध्ये ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून देवणी बाजार समितीमध्ये ४ हजार ६४८ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. आजचा उच्चांकी दर हा ४ हजार ६६५ रूपये प्रतिक्विंटल एवढा देवणी बाजार समितीमध्ये मिळाला.  

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/01/2024
सिल्लोड---क्विंटल96455046504600
देवणीपिवळाक्विंटल40463146654648

Web Title: maharashtra agriculture farmer soybean rate today market yard price ram mandir ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.