Lokmat Agro >बाजारहाट > आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर

आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर

maharashtra agriculture farmer Today cotton has not got anywhere near the guaranteed price | आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर

आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

शेअर :

Join us
Join usNext

कापसाचे दर मागच्या अनेक दिवसांपासून पडताना दिसत असून सध्या कोणत्याच बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळताना दिसत नाही. आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर हा ५ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी एवढा होता. कापसाल ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर झाला असून आजचा कापसाचा हा दर हमीभावापेक्षा १ हजार ४०० रूपयांनी कमी आहे. 

दरम्यान, आज एच-४ - मध्यम स्टेपल,  लोकल,  मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. आज ६ हजार ३०० ते ६ हजार ९०० रूपयांच्या दरम्यान कापसाला सरासरी दर मिळाला. तर अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ६ हजार ९५४ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.  

नेर परसोपंत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ५ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या ठिकाणी केवळ ३८ क्विंटल कापसाची आवक  झाली होती.  आज सावनेर, मारेगाव, देऊळगाव राजा, वरोरा, वरोरा खांबाडा, वरोरा माढेली, हिंगणघाट, वर्धा या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. तर हिंगणघाट येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १० हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/02/2024
सावनेर---क्विंटल3600665066506650
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1468665068506750
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल788655067006600
अकोलालोकलक्विंटल115675070116880
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल127670072086954
उमरेडलोकलक्विंटल992631066006450
देउळगाव राजालोकलक्विंटल4313600068506700
वरोरालोकलक्विंटल2818580067216500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1200605067506400
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1608605067006500
नेर परसोपंतलोकलक्विंटल38560056005600
काटोललोकलक्विंटल335540067006500
हिंगणालोकलक्विंटल36620067016700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10000600069756300
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1825635069206620
यावलमध्यम स्टेपलक्विंटल281603067106320
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल92640065006450
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल173665068006700

Web Title: maharashtra agriculture farmer Today cotton has not got anywhere near the guaranteed price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.