Join us

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 6:14 PM

आज सोयाबीनला किती मिळाला दर?

सोयाबनच्या दरातील घसरण मागच्या काही दिवसांपासून सुरूच आहे. नव्या वर्षातही विक्रमी घसरण होत असून आज केवळ २ हजार ५०० रूपये सरासरी दराची पातळी दराने गाठली आहे. केंद्राने लोकसभा निवडणुकांचा विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. तर काही शेतकऱ्यांनी दरवाढ होण्याच्या अपेक्षेने घरातच सोयाबीन साठवून ठेवलेली आहे. येणाऱ्या काळात दर वाढतील आणि सोयाबीनला चांगला दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. 

दरम्यान, आज पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार लोकल, पांढरा आणि पिवळा या वाणाच्या सोयाबीनची आवक झाली होती. तर आज ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रूपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. त्याचबरोबर शहादा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी २ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हिंगणघाट येथे ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सांगलीतील तासगाव येथे ५ हजार ७० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. 

तासगाव बाजार समितीमध्ये आज केवळ २३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये किमान ४ हजार ९८० तर कमाल ५ हजार २१० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. आज अमरावती बाजार समितीत ३ हजार ८०७ क्विंटल सोयाबीनची विक्रमी आवक झाली होती. सोयाबीनच्या सरासरी आवक लक्षात घेतली तर बाजारात होणारी आवक कमी झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/01/2024
लासलगाव---क्विंटल517380046514611
लासलगाव - विंचूर---क्विंटल462300046124550
जळगाव---क्विंटल52470047004700
शहादा---क्विंटल33250026112500
बार्शी---क्विंटल741460046754675
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल8435045004425
माजलगाव---क्विंटल405450046164585
राहूरी -वांबोरी---क्विंटल7430045014400
पाचोरा---क्विंटल80420046914454
कारंजा---क्विंटल3200449046654590
तुळजापूर---क्विंटल160465046504650
मालेगाव (वाशिम)---क्विंटल240420046104400
राहता---क्विंटल20445046114550
अमरावतीलोकलक्विंटल3807455046454597
अकोलेलोकलक्विंटल14460147504651
अमळनेरलोकलक्विंटल40450046504650
हिंगोलीलोकलक्विंटल690419946504424
कोपरगावलोकलक्विंटल62420045964490
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल6375045194036
नागपूरपांढराक्विंटल162420045354451
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल212460047004650
जालनापिवळाक्विंटल1924390047004550
अकोलापिवळाक्विंटल1822404046704600
यवतमाळपिवळाक्विंटल273435045804465
मालेगावपिवळाक्विंटल10389045734540
चिखलीपिवळाक्विंटल1090430048004550
हिंगणघाटपिवळाक्विंटल834280047453700
बीडपिवळाक्विंटल51460046604628
वाशीमपिवळाक्विंटल3000455047114650
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल250445046504550
भोकरपिवळाक्विंटल86400045304266
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल318450046004550
जिंतूरपिवळाक्विंटल98455546004575
मलकापूरपिवळाक्विंटल510402545754400
दिग्रसपिवळाक्विंटल101453046204595
वणीपिवळाक्विंटल219449045804500
सावनेरपिवळाक्विंटल35400044094300
गेवराईपिवळाक्विंटल26454145504545
चांदूर बझारपिवळाक्विंटल282435045604412
दर्यापूरपिवळाक्विंटल900425046704520
देउळगाव राजापिवळाक्विंटल3450046314600
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल109400045004300
नांदगावपिवळाक्विंटल15440046804650
तासगावपिवळाक्विंटल23498052105070
आंबेजोबाईपिवळाक्विंटल300465947114670
निलंगापिवळाक्विंटल150440046984500
औराद शहाजानीपिवळाक्विंटल489464046704655
मुरुमपिवळाक्विंटल148420145554378
उमरगापिवळाक्विंटल8454045504540
सेनगावपिवळाक्विंटल104435046004500
पाथरीपिवळाक्विंटल13450045504500
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल80450045904550
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120460047004650
राजूरापिवळाक्विंटल72426044204395
काटोलपिवळाक्विंटल155445046004500
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल714400046004500
देवणीपिवळाक्विंटल43470047524726
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड