Lokmat Agro >बाजारहाट > कापसाचे दर हमीभावापेक्षा तब्बल १ हजारांनी कमी

कापसाचे दर हमीभावापेक्षा तब्बल १ हजारांनी कमी

maharashtra agriculture farmer today price of cotton maarket yard almost 1 thousand less than the guaranteed price | कापसाचे दर हमीभावापेक्षा तब्बल १ हजारांनी कमी

कापसाचे दर हमीभावापेक्षा तब्बल १ हजारांनी कमी

राज्यभरातील कापसाला आज किती मिळाला दर

राज्यभरातील कापसाला आज किती मिळाला दर

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या दोन ते तीन महिन्यापासून कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असून शेतकऱ्यांना तब्बल ५०० ते १ हजार रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आजच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यात केवळ एका बाजार समितीमध्ये कापसाला ७ हजारांच्या वर दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळण्याच्या हेतूने कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. 

दरम्यान, आज लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल, एच-४-मध्यम स्टेपल या कापसाची आज आवक झाली होती. तर अकोला बोरगावमंजू येथे ७ हजार २५५ रूपयांचा कमाल दर तर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार २७ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या ठिकाणी केवळ १२५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. 

तर नेर परसोपंत या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ६ हजार ५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला प्रतिक्विंटल तब्बल १ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या बाजार समितीमध्ये केवळ २५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/01/2024
सावनेर---क्विंटल3400677568506800
भद्रावती---क्विंटल277640068006600
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल180680068506825
अकोलालोकलक्विंटल542688071306970
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल125680072557027
उमरेडलोकलक्विंटल834660069006750
वरोरालोकलक्विंटल3104625069006700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1927665069006800
नेर परसोपंतलोकलक्विंटल25605060506050
मांढळलोकलक्विंटल145656068506700
हिंगणालोकलक्विंटल30620068506675
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1460655070156900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल7000600071956500
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5050640071056950

Web Title: maharashtra agriculture farmer today price of cotton maarket yard almost 1 thousand less than the guaranteed price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.