Join us

तुरीच्या सरासरी दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 7:18 PM

आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर?

मागच्या काही दिवसांपासून तुरीला चांगला दर मिळत आहे. तर सध्या तुरीला १०  हजारांहून अधिक सरासरी दर तुरीला मिळताना दिसत आहे. तर किमान दरामध्येही घसरण झाल्याची आपल्याला पाहायला मिळेल. दर चांगला मिळत  असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे. 

दरम्यान, आज पांढरा, लाल,  गज्जर तुरीची बाजारात आवक झाली होती.  त्यामध्ये कारंजा, रिसोड, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, वाशिम आणि मेहकर बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटलपेक्षा जास्त  तुरीची आवक झाली होती. तर त्यामध्ये उच्चांकी आवक ही अमरावती बाजार समितीमध्ये १२ हजार १८१  क्विंटल तुरीची झाली होती. आजच्या उच्चांकी दराचा विचार केला तर मुरूम बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त  दर मिळाला आहे. 

मुरूम येथे ३३२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर या ठिकाणी १० हजार २७० रूपये सरासरी दर मिळाला आहे. हा दर यंदाच्या हंगामातील उच्चांकी सरासरी दर आहे. तर अंबड वडीगोद्री बाजार समितीमध्ये ६ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा आजचा सर्वांत कमी सरासरी दर आहे. या बाजार समितीमध्ये केवळ २१ क्विंटल तुरीची आवक झाली होती. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/02/2024
दोंडाईचा---क्विंटल144600094009200
बार्शी---क्विंटल2930093009300
बार्शी -वैराग---क्विंटल1970097009700
राहूरी -वांबोरी---क्विंटल1800080008000
पैठण---क्विंटल15835095009161
भोकर---क्विंटल32920097009450
कारंजा---क्विंटल18008650104259700
परळी-वैजनाथ---क्विंटल20920095009400
रिसोड---क्विंटल18409260103509800
मुरुमगज्जरक्विंटल332101001044110270
सोलापूरलालक्विंटल9900098009800
लातूरलालक्विंटल206394101047710200
अकोलालालक्विंटल28118800105009850
अमरावतीलालक्विंटल121819150102509700
यवतमाळलालक्विंटल4879200100559627
मालेगावलालक्विंटल52819993998801
चिखलीलालक्विंटल6258501102259363
नागपूरलालक्विंटल395890001045110088
अक्कलकोटलालक्विंटल3209500105409500
वाशीमलालक्विंटल30009250100509500
वाशीम - अनसींगलालक्विंटल60940097009550
चाळीसगावलालक्विंटल130714193529000
पाचोरालालक्विंटल100873095719200
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल91930098009550
जिंतूरलालक्विंटल79950099009700
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल21610093006600
परतूरलालक्विंटल100930096059500
मेहकरलालक्विंटल1230850098109500
धरणगावलालक्विंटल5850096059400
नांदगावलालक्विंटल6850093009250
औसालालक्विंटल638000103519782
निलंगालालक्विंटल40100001030110200
चाकूरलालक्विंटल2080011037110026
मुखेडलालक्विंटल22101001020010100
तुळजापूरलालक्विंटल309500100519800
सेनगावलालक्विंटल162930097009500
बार्शी - टाकळीलालक्विंटल21920097009400
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल4049250100959550
नेर परसोपंतलालक्विंटल247700095508985
राजूरालालक्विंटल40850495009325
सिंदीलालक्विंटल218650100009450
जळकोटलालक्विंटल32898501070010451
दुधणीलालक्विंटल67697001040010050
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल65720099008550
माजलगावपांढराक्विंटल142772598569700
पाचोरापांढराक्विंटल40891593709100
शेवगावपांढराक्विंटल34800095009500
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल7920093009300
गेवराईपांढराक्विंटल2966700101008500
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल1476701100257181
परतूरपांढराक्विंटल60935096009450
देउळगाव राजापांढराक्विंटल22800096009000
तुळजापूरपांढराक्विंटल209500100519850
पाथरीपांढराक्विंटल56730196009411
देवळापांढराक्विंटल1700588008725
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड