Join us

आज राज्यात कापसाला किती मिळाला दर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 8:24 PM

आजचे राज्यातील कापसाचे सविस्तर दर जाणून घ्या

यंदा कापसाच्या दराने शेतकऱ्यांना नाराज केलं असून मातीमोल दराने कापसाची विक्री होताना दिसत आहे. दर नसल्याने पणन महासंघ आणि सीसीआयकडूनही तेवढ्या प्रमाणात  कापसाची खरेदी केली जात नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. पण येणाऱ्या काळात  कापसाचे दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, आज राज्यभरात ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, ए.के.एच. ४ - मध्यम स्टेपल, एच.४ - मध्यम स्टेपल, लोकल, मध्यम स्टेपल आणि वरलक्ष्मी - मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये सावनेर, मारेगाव, देऊळगाव राजा, हिंगणघाट, वर्धा आणि सिंदू-सेलू बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १ हजारांहून अधिक क्विंटल कापसाची आवक झाली होती.  तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये १० हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. आजच्या कमाल आणि किमान दराचा विचार केला तर देऊळगावा राजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजेच ७ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. तर भद्रावती आणि आष्टी-वर्धा  बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील निच्चांकी म्हणजेच ६ हजार ५५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या ठिकाणी अनुक्रमे ३३८ आणि ५३४ क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/02/2024
सावनेर---क्विंटल3600675067506750
किनवट---क्विंटल514662569206850
भद्रावती---क्विंटल368620069006550
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल534600067006550
पांढरकवडाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल575662069206800
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1399675068506750
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल708640067006600
अकोलालोकलक्विंटल101693070006965
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल122690071957047
उमरेडलोकलक्विंटल508650068906700
देउळगाव राजालोकलक्विंटल3160660075007300
काटोललोकलक्विंटल165660068006700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10000600073006600
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल2310635071006850
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल144655066506600
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2640655072557150
भिवापूरवरलक्ष्मी - मध्यम स्टेपलक्विंटल450650070006750
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूस