Join us

Todays Cotton Rates : आज बाजारात कशी होती कापसाच्या दराची स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 9:07 PM

आज राज्य भरातील कापसाला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

मागच्या एका महिन्यापासून कापसाच्या दराने निच्चांकी गाठली आहे. तर अनेक बाजार समित्यांमध्ये आज हमीभावाएवढा सुद्धा दर मिळाला नाही. मागच्या दोन दिवसांचा विचार केला तर काही बाजार समित्यांमध्ये हलकेसे दर वाढलेले दिसत आहेत. आज राज्यातील तीन बाजार समित्यांमध्ये ७ हजारांहून अधिक सरासरी दर मिळाला आहे. येणाऱ्या काळात दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, आज मध्यम स्टेपल, लोकल, एच-४ - मध्यम स्टेपल, ए. के. एच. ४ - मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये सावनेर, मारेगाव, देऊळगाव राजा, वरोरा, वरोरा-खांबाडा, हिंगणघाट आणि सिंदी-सेलू बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजेच १२ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आजच्या किमान आणि कमाल दराचा विचार केला तर देऊळगावा राजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजेच ७ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये २ हजार ८०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर नेर परसोपंत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील निच्चांकी म्हणजेच ६ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये ११ क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/02/2024
सावनेर---क्विंटल3600675067506750
पांढरकवडाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल495662096756850
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1297665068506750
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल852645067256600
अकोलालोकलक्विंटल111678070306905
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल144700073397169
उमरेडलोकलक्विंटल491650069806750
देउळगाव राजालोकलक्विंटल2800660075007200
वरोरालोकलक्विंटल3913600071506500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1377600071006700
नेर परसोपंतलोकलक्विंटल11600060006000
काटोललोकलक्विंटल155660068006750
हिंगणालोकलक्विंटल52640068506700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल12000600073256600
यावलमध्यम स्टेपलक्विंटल363605066406320
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2950670073007050
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूसबाजार