आज सकाळच्या सत्रात राज्यभरातील केवळ तीन बाजार समित्यांमध्ये कापसाचे लिलाव झाले. यामध्ये भद्रावती, उमरेड आणि सिंदी-सेलू या बाजार समित्यांचा सामावेश आहे. आज सिंदी सेलू या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील विक्रमी आवक झाली होती.
दरम्यान, आज मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाची बाजारात आवक झाली होती. त्यामध्ये सिंदी सेलू येथे आवक झालेल्या २ हजार ११० क्विंटल कापसाला किमान ६ हजार ५५० तर कमाल ६ हजार ९२० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर येथील सरासरी दर हा ६ हजार ८५० एवढा होता. त्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर मिळाला आहे.
उमरेड बाजार समितीमध्ये ७२७ क्विंटल कापसाची आवक झाली असून येथे केवळ ६ हजार ४५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर होता. तर भद्रावती बाजार समितीमध्ये आज ५७८ क्विंटल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी ६ हजार ५५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
आजचे कापसाचे सविस्तर दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
05/02/2024 | ||||||
भद्रावती | --- | क्विंटल | 578 | 6400 | 6700 | 6550 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 727 | 6300 | 6640 | 6450 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 2110 | 6550 | 6920 | 6850 |