Join us

कापसाला आज किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 5:41 PM

आज सकाळच्या सत्रात राज्यभरातील केवळ तीन बाजार समित्यांमध्ये कापसाचे लिलाव झाले.

आज सकाळच्या सत्रात राज्यभरातील केवळ तीन बाजार समित्यांमध्ये कापसाचे लिलाव झाले. यामध्ये भद्रावती, उमरेड आणि सिंदी-सेलू या बाजार समित्यांचा सामावेश आहे. आज सिंदी सेलू या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील विक्रमी आवक झाली होती.

दरम्यान, आज मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाची बाजारात आवक झाली होती. त्यामध्ये सिंदी सेलू येथे आवक झालेल्या २ हजार ११० क्विंटल कापसाला किमान ६ हजार ५५० तर कमाल ६ हजार ९२० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर  येथील सरासरी दर हा ६ हजार ८५० एवढा होता. त्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर मिळाला आहे.

उमरेड बाजार समितीमध्ये ७२७ क्विंटल कापसाची आवक झाली असून येथे केवळ ६ हजार ४५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर होता. तर भद्रावती बाजार समितीमध्ये आज ५७८ क्विंटल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी ६ हजार ५५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/02/2024
भद्रावती---क्विंटल578640067006550
उमरेडलोकलक्विंटल727630066406450
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2110655069206850
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डकापूस