Join us

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 4:35 PM

आज राज्यभरातील सोयाबीनला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

आज सकाळच्या  सत्रात राज्यातील केवळ २१ बाजार समित्यामध्ये सोयाबीनची आवक आणि लिलाव पार पडला. यामध्ये केवळ एका बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला आहे. तर इतर बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर होता. मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीनचे दर खाली येत असून सध्या काही ठिकाणी हमीभावापेक्षा एका हजाराने कमी दर मिळताना दिसत आहेत. 

दरम्यान, आज सकाळी लोकल आणि पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये गंगाखेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ६५० रूपये एवढा सरासरी दर मिळाला असून येथे केवळ २५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. त्याचबरोबर अंबड वडीगोद्री आणि सिंदी-सेलू या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आज सिंदी सेलू आणि कारंजा या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली होती. इतर बाजार समित्यांमध्ये एक हजार क्विंटलपेक्षा कमी सोयाबीनची आवक झाली आहे. सोयाबीनची आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर कोसळल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून अनेक शेतकऱ्यांनी दर नसल्यामुळे आपला माल साठवून ठेवला आहे. 

 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/02/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21380042514026
कारंजा---क्विंटल2500410044554350
तुळजापूर---क्विंटल60446044604460
मालेगाव (वाशिम)---क्विंटल450410043654200
सोलापूरलोकलक्विंटल18450045004500
नागपूरलोकलक्विंटल399410042004175
हिंगोलीलोकलक्विंटल500410545504327
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल32370044513850
यवतमाळपिवळाक्विंटल309408043804230
मालेगावपिवळाक्विंटल8412543664360
चिखलीपिवळाक्विंटल810410044004250
चाळीसगावपिवळाक्विंटल40427743254289
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल142430043504325
गेवराईपिवळाक्विंटल22434543504350
गंगाखेडपिवळाक्विंटल25465047004650
औराद शहाजानीपिवळाक्विंटल369447145054488
पाथरीपिवळाक्विंटल14435044004396
पालमपिवळाक्विंटल75450045004500
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल257410044304250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1000380044003850
सोनपेठपिवळाक्विंटल25447144714471
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड