Join us

आजही सोयाबीनला मिळाला नाही हमीभावाएवढा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 8:07 PM

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये सोयाबीनला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीनच्या दराने माना टाकल्या आहेत. तर अनेक ठिकाणी हमीभावाएवढा दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होताना दिसत आहे. सध्या बाजारात आलेल्या सोयाबीनलाही हमीभाव मिळत नसून शेतकऱ्यांना एका क्विंटलपाठीमागे २०० ते ८०० रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. 

दरम्यान, आजच्या सोयाबीनच्या दराचा विचार केला तर आज हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा या तुरीची  आवक झाली होती.  त्यामध्ये कारंजा, अमरावती, जालना, अकोला, हिंगणघाट, उमरेड या बाजार समित्यांमध्ये १ हजारांहून अधिक सोयाबीनची आवक झाली होती.  त्यामध्ये सर्वांत जास्त सोयाबीनची आवक ही अमरावती बाजार समितीमध्ये ३ हजार ९६३ क्विंटल एवढी झाली होती. या बाजार समितीमध्ये ४ हजार ३११ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. 

आजच्या कमाल आणि किमान दराचा विचार केला तर पणन विभागाच्या अधिकृत माहितीनुसार हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये १ हजार ८३० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर सर्वांत जास्त  दर हा उमरखेड डांकी बाजार समितीमध्ये ४ हजार ६२० रूपये प्रतिक्विंटल सरासरी एवढा होता.

आजचे सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/02/2024
लासलगाव---क्विंटल251350044004361
लासलगाव - विंचूर---क्विंटल469300044514400
शहादा---क्विंटल15438144644385
माजलगाव---क्विंटल524400044814400
राहूरी -वांबोरी---क्विंटल1425242524252
पाचोरा---क्विंटल125427543104300
कारंजा---क्विंटल2500400544454275
तुळजापूर---क्विंटल90440044254410
मोर्शी---क्विंटल300420043304265
राहता---क्विंटल46425143694300
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल234400045284440
सोलापूरलोकलक्विंटल76443044554435
अमरावतीलोकलक्विंटल3963425043724311
परभणीलोकलक्विंटल130440045004450
राहूरीलोकलक्विंटल5420042004200
हिंगोलीलोकलक्विंटल400410044854292
कोपरगावलोकलक्विंटल85414144194299
मेहकरलोकलक्विंटल970390044504200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल135403143614340
जळकोटपांढराक्विंटल176430046004450
जालनापिवळाक्विंटल1371330043754350
अकोलापिवळाक्विंटल2251403544404350
यवतमाळपिवळाक्विंटल191419043704280
मालेगावपिवळाक्विंटल8370043164260
चिखलीपिवळाक्विंटल460410043504225
हिंगणघाटपिवळाक्विंटल1830270045053700
उमरेडपिवळाक्विंटल1393380045204300
वर्धापिवळाक्विंटल68408542404150
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल110425043504300
जिंतूरपिवळाक्विंटल92419943604270
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल850425044354365
मलकापूरपिवळाक्विंटल860390042754105
वणीपिवळाक्विंटल155429543654300
गेवराईपिवळाक्विंटल13400043004300
परतूरपिवळाक्विंटल33420044504444
चांदूर बझारपिवळाक्विंटल185400544104210
देउळगाव राजापिवळाक्विंटल30420043764300
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल51422542504240
आंबेजोबाईपिवळाक्विंटल180430044744430
औराद शहाजानीपिवळाक्विंटल332440844764442
मुखेडपिवळाक्विंटल4457545754575
सेनगावपिवळाक्विंटल11400043004100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल410460046504620
राजूरापिवळाक्विंटल122405042754182
काटोलपिवळाक्विंटल123390044004200
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल625400044504350
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड