यंदाच्या हंगामात तुरीला चांगले दर मिळताना दिसून येत आहेत. तर काही बाजार समित्यांमध्ये १० हजारांच्या वर हे दर पोहोचले आहेत. आज शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यातील अनेक बाजार समित्यांना सुट्टी होती. तर आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार केवळ ३ बाजार समित्यांमध्ये तुरीचा लिलाव पार पडला.
दरम्यान, आज मोर्शी, सावनेर, वरोरा-खांबाडा बाजार समित्यांमध्ये तूर आली होती. आज केवळ लाल तुरीची आवक झाली असून मोर्शी बाजार समितीमध्ये ९९० क्विंटल, सावनेर बाजार समितीमध्ये ६११ क्विंटल तर वरोरा-खांबाडा बाजार समितीमध्ये २ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर आझ वरोरा खांबाडा बाजार समितीमध्ये ८ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी दर होता.
तर मोर्शी बाजार समितीमध्ये ९ हजार ८७७ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर होता. येथील कमाल दर हा १० हजार १५५ रूपये प्रतिक्विंटल एवढा होता.
आजचे तुरीचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
19/02/2024 | ||||||
मोर्शी | --- | क्विंटल | 990 | 9600 | 10155 | 9877 |
सावनेर | लाल | क्विंटल | 611 | 9000 | 9843 | 9600 |
वरोरा-खांबाडा | लाल | क्विंटल | 2 | 8700 | 9000 | 8800 |