Join us

जाणून घ्या आजचे तुरीचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 8:47 PM

आज तुरीला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

यंदा तुरीला चांगला दर मिळत असून दर हे १० हजारांच्या पुढे गेले आहेत. तर काही बाजार समित्यांमध्ये ८ हजारांच्या आसपास दर मिळताना दिसत आहेत. सरासरी दराचा विचार केला तर पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यात ९ हजारांपासून १० हदारांपर्यंत तुरीला दर मिळत आहे. तर अनेक बाजार समित्यांत १० हजार ते १० हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळत आहे. 

दरम्यान, आज गज्जर, लाल, लोकल, पांढरा या तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये मेहकर, चांदूर बाजार, मुर्तीजापूर, हिंगणघाट, अमरावती, अकोला, कारंजा या बाजार समित्यांमध्ये १ हजार क्विंटलहून अधिक तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजेच ११ हजार ८४४ क्विंटल तूर आवक झाली होती. तर राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये १०० क्विंटलपेक्षा कमी तूर आयात होताना दिसत आहे. 

आजच्या कमाल आणि  किमान दराचा विचार केला तर आज जळकोट आणि औराद शहाजानी बाजार समित्यांमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजेच १० हजार १५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे २४६ क्विंटल आणि १७९ क्विंटल तुरीची आवक झाली होती.  तर काटोल बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील निच्चांकी म्हणजे ८ हजार ४५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

आजचे तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/02/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल4866190618999
शहादा---क्विंटल17750092008452
राहूरी -वांबोरी---क्विंटल2945298019600
पैठण---क्विंटल30885095509000
कारंजा---क्विंटल25008300100009300
मोर्शी---क्विंटल800920098209510
हिंगोलीगज्जरक्विंटल600900098509425
मुरुमगज्जरक्विंटल1759500100009750
सोलापूरलालक्विंटल41921094209306
जालनालालक्विंटल149900098009600
अकोलालालक्विंटल20668500103409655
अमरावतीलालक्विंटल118449100100119555
धुळेलालक्विंटल30750095108500
जळगावलालक्विंटल25960098009800
यवतमाळलालक्विंटल587920097809490
परभणीलालक्विंटल38970098009750
मालेगावलालक्विंटल52650095209340
चिखलीलालक्विंटल560810096708885
हिंगणघाटलालक्विंटल30417900106058700
अमळनेरलालक्विंटल100800092009200
पाचोरालालक्विंटल10909592009100
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल77920098009500
जिंतूरलालक्विंटल36940098009600
मुर्तीजापूरलालक्विंटल1300937598159615
वणीलालक्विंटल349914095709300
सावनेरलालक्विंटल845900194759275
कोपरगावलालक्विंटल3500094008800
रावेरलालक्विंटल9900093409200
परतूरलालक्विंटल90942597009600
चांदूर बझारलालक्विंटल12198050100009400
मेहकरलालक्विंटल1230850095409300
औराद शहाजानीलालक्विंटल17799601015210056
मुखेडलालक्विंटल149900100009900
तुळजापूरलालक्विंटल409500100009850
सेनगावलालक्विंटल259920095509350
पांढरकवडालालक्विंटल169920097009400
भंडारालालक्विंटल3850085008500
चिमुरलालक्विंटल20090000
राजूरालालक्विंटल30760092259145
सिंदी(सेलू)लालक्विंटल630900095009400
जळकोटलालक्विंटल24698501050010150
उमरेडलोकलक्विंटल330800096009050
वर्धालोकलक्विंटल111935094909400
काटोललोकलक्विंटल440820096168450
जालनापांढराक्विंटल8477000104009700
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल349576100009788
माजलगावपांढराक्विंटल22085001018110000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल12950097009700
गेवराईपांढराक्विंटल215770099518825
परतूरपांढराक्विंटल57937695009475
देउळगाव राजापांढराक्विंटल14800095009000
गंगापूरपांढराक्विंटल46880093509120
औराद शहाजानीपांढराक्विंटल179100001030010150
तुळजापूरपांढराक्विंटल309500100009800
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्ड