Join us

आज तुरीला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 9:53 PM

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार चार बाजार समित्यांमध्ये  तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये सिल्लोड बाजार समितीमध्ये १५ क्विंटल, वरोरो बाजार समितीत २, वरोरा खांबाडा बाजार समितीत ८ आणि जळकोट बाजार समितीत ८४६ क्विंटल तुरीची आवक झाली होती. आज बहुतांश ठिकाणी लाल तुरीची आवक झाली असून ९ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

दरम्यान, वरोरा आणि वरोरो खांबाडा बाजार समितीतीत आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ७ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर सिल्लोड बाजार समितीत ८ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला असून जळकोट बाजार समितीत ९ हजार ५०० हा कमाल दर होता.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/01/2024
सिल्लोड---क्विंटल15830086008500
वरोरालालक्विंटल2760080007800
वरोरा-खांबाडालालक्विंटल8760080007800
जळकोटलालक्विंटल846860095009150
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड