आज राज्यातील अनेक बाजार समित्या बंद असल्याने राज्यातील केवळ ८ बाजार समित्यांमध्ये तुरीचे लिलाव पार पडले आहेत. तर मागच्या काही दिवसांपासून तुरीला मिळत असलेला दर काहीसा कमी झाल्याचं चित्र आजच्या बाजार दरावरून दिसून येत आहे. दरम्यान, आज राज्यातील एकाही बाजार समितीमध्ये १० हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला नाही.
दरम्यान, आज दौंडाईचा, अकोला, नागपूर, दौंड-पाटस, पाथर्डी, छत्रपती संभाजीनगर, शेवगाव, शेवगाव-बोधेगाव या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये सर्वांत जास्त आवक ही नागपूर आणि अकोला बाजार समितीमध्ये झाली असून या ठिकाणी अनुक्रमे २ हजार ३९४ आणि १ हजार ६५० क्विंटल तुरीची आवक झाली होती.
तर पाथर्डी येथे आवक झालेल्या नं.१ वाणाच्या ७ क्विंटल तुरीला आजच्या दिवसातील सर्वाधिक म्हणजे ९ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये आवक झालेल्या पांढरा वाणाच्या १६ क्विंटल तुरीला ८ हजार ४०० रूपये सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी दर होता.
आजचे सविस्तर तुरीचे दर जाणून घ्या
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
26/02/2024 | ||||||
दोंडाईचा | --- | क्विंटल | 75 | 8000 | 9200 | 9000 |
अकोला | लाल | क्विंटल | 1650 | 8200 | 10200 | 9400 |
नागपूर | लाल | क्विंटल | 2394 | 9000 | 10060 | 9795 |
दौंड-पाटस | लाल | क्विंटल | 1 | 8600 | 8600 | 8600 |
पाथर्डी | नं. १ | क्विंटल | 7 | 9500 | 9800 | 9700 |
छत्रपती संभाजीनगर | पांढरा | क्विंटल | 16 | 7000 | 9801 | 8400 |
शेवगाव | पांढरा | क्विंटल | 7 | 9000 | 9000 | 9000 |
शेवगाव - भोदेगाव | पांढरा | क्विंटल | 2 | 9200 | 9200 | 9200 |