विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी बंद पुकारल्यामुळे आज राज्यभरातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. तर अनेक काही बाजार समित्यांमधील लिलाव पार पडले आहेत. आज राज्यभरात केवळ ५ बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे लिलाव पार पडले असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, राहता, नागपूर, अकोला, उमरखेड-डांकी बाजार समितीमध्ये सोयाबीनची खरेदी-विक्री करण्यात आली.
दरम्यान, अकोला बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे २ हजार ७२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये ४ हजार ३०० रूपये सरासरी दर मिळाला असून छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये ४ हजार २६ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी सरासरी दर होता.
उमरखेड डांकी बाजार समितीमध्ये ६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी आजच्या दिवशी ४ हजार ६२० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी सरासरी दर होता.
आजचे सोयाबीनचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
26/02/2024 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 5 | 4201 | 4250 | 4226 |
राहता | --- | क्विंटल | 11 | 4106 | 4341 | 4300 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 175 | 4100 | 4300 | 4250 |
अकोला | पिवळा | क्विंटल | 2729 | 4100 | 4350 | 4300 |
उमरखेड-डांकी | पिवळा | क्विंटल | 60 | 4600 | 4650 | 4620 |