Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे कापसाचे सविस्तर दर

जाणून घ्या आजचे कापसाचे सविस्तर दर

maharashtra agriculture today farmer cotton rates market yard | जाणून घ्या आजचे कापसाचे सविस्तर दर

जाणून घ्या आजचे कापसाचे सविस्तर दर

कापसाला आज किती मिळाला दर?

कापसाला आज किती मिळाला दर?

शेअर :

Join us
Join usNext

 

कापसाचे दर मागच्या अनेक दिवसांपासून पडेलेल असून शेतकऱ्यांची द्विधा अवस्था झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील कापूस दर जास्त मिळतील या हेतून साठवून ठेवला आहे पण दर नसल्याने शेतकऱ्यांना आता दुहेरी तोटा होण्याची शक्यता आहे. तर यंदाच्या हंगामात ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर करूनही तेवढा दर मिळताना दिसत नाही. तर लोकसभा तोंडावर आल्यामुळे केंद्र सरकारकडून दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

दरम्यान, आज ए.के.एच.४ - लांब स्टेपल, लोकल, मध्यम स्टेपल, लांब स्टेपल कापसाची आवक झाली होती. हिंगणघाट बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ६ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. तेथे ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये ७ हजार १२५ एवढा सरासरी दर मिळाला. आजच्या दिवसातील हा सर्वांत जास्त सरासरी दर होता. अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये केवळ ४०६ क्विंटल कापसाची आवक झाली होती.

तर देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसांतील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. ३ हजार २७० क्विंटल कापसाची आवक झालेल्या या बाजार समितीमध्ये केवळ ६ हजार ३०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/01/2024
संगमनेर---क्विंटल130550069006200
सावनेर---क्विंटल3000675067506750
भद्रावती---क्विंटल618680069706885
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल412600068006650
अकोलालोकलक्विंटल406558072306970
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल109705072007125
उमरेडलोकलक्विंटल1042650069106750
देउळगाव राजालोकलक्विंटल3270580069206300
वरोरालोकलक्विंटल3445650069006700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1638650068606700
नेर परसोपंतलोकलक्विंटल35605060506050
काटोललोकलक्विंटल230640068006700
हिंगणालोकलक्विंटल26620068506850
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1610655070406900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल6000600071406500
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1980650070206750
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5745640070756900

Web Title: maharashtra agriculture today farmer cotton rates market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.