Lokmat Agro >बाजारहाट > कांद्याचे बाजारभाव, ना हलेना ना डुलेना

कांद्याचे बाजारभाव, ना हलेना ना डुलेना

maharashtra farmer agriculture today onion rate market yard | कांद्याचे बाजारभाव, ना हलेना ना डुलेना

कांद्याचे बाजारभाव, ना हलेना ना डुलेना

जाणून घ्या आजचे कांद्याचे दर

जाणून घ्या आजचे कांद्याचे दर

शेअर :

Join us
Join usNext

 मागच्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरातील घसरण चालूच आहे. आज कांद्याच्या दराने निच्चांकी पातळी गाठली असून राज्यातील एका बाजार समितीमध्ये केवळ ८०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. तर राज्यभरातील कांद्याचे सरासरी दर हे १ हजार ५०० रूपयांच्या आसपास होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराशा होत असून सरकार लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर ग्राहकहितासाठी शेतकऱ्यांचा विचार करत नसल्याचं दिसतंय. 

दरम्यान, आज हालवा, लाल, लोकल, नं.१, पांढरा, पोळ आणि उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. उन्हाळी कांदा आता संपत आला असून आज केवळ १ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे ८०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सर्वांत कमी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये ५६० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर केवळ ३०० रूपये प्रतिक्विंटल किमान दर मिळाला आहे. तर मंगळवेढा येथे १०० रूपये प्रतिक्विंटल म्हणजे १ रूपया किलो याप्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळाला आहे. 

आज हिंगणा आणि चंद्रपूर गंजवड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजे २ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. तर पुण्यातील खडकी येथे २ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. पुण्यातील मोशी बाजार समितीमध्ये १ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. तर कांद्याचे माहेरघर असलेल्या लासलगाव विंचूर येथे १ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 

जाणून घ्या आजचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2024
कोल्हापूर---क्विंटल1131950028001500
अकोला---क्विंटल1500140020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल126020018001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल564200030002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12766150023001900
विटा---क्विंटल40100022001550
हिंगणा---क्विंटल7180030002500
कराडहालवाक्विंटल150150025002500
बारामतीलालक्विंटल23850025011900
येवलालालक्विंटल1400065018801725
येवला -आंदरसूललालक्विंटल1000030018181725
धुळेलालक्विंटल12515017001300
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1400080019001750
नागपूरलालक्विंटल1400150022002025
सिन्नरलालक्विंटल374150018051650
सिन्नर - नायगावलालक्विंटल61950018001700
कळवणलालक्विंटल530070020301451
मनमाडलालक्विंटल510030018401700
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल343060017761650
साक्रीलालक्विंटल1205100016801500
वैजापूरलालक्विंटल83480020001600
देवळालालक्विंटल625025019451825
उमराणेलालक्विंटल1350075120001800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60050021001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1151240027001500
पुणेलोकलक्विंटल1333780021001450
पुणे- खडकीलोकलक्विंटल5200025002250
पुणे-मोशीलोकलक्विंटल43950015001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1800120019661750
मंगळवेढालोकलक्विंटल56210023001500
शेवगावनं. १नग910140019001900
कल्याणनं. १क्विंटल3120018001500
शेवगावनं. २नग770100013001300
शेवगावनं. ३नग560300800800
नागपूरपांढराक्विंटल1400160022002050
नाशिकपोळक्विंटल500065023001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1620040022001751
कळवणउन्हाळीक्विंटल350160022551700
लोणंदउन्हाळीक्विंटल100050021001500

Web Title: maharashtra farmer agriculture today onion rate market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.